पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/४७९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग ६ अमृतसरची काँग्रेस ४४ भाग आला. आणि अशा रीतीने एकीचा विधाड न होता अमृतसरहून सर्व मंडळी परत गेली. अमृतसर सोडण्यापूर्वी एक दिवस डॉ. किश्श्रलु यांच्या अध्यक्षतेखाली स्वराज्य- संघ-शाखेने भरविलेल्या सभेत टिळकांचे भाषण झाले. त्यात टिळक म्हणाले "मी जो ठरावात शब्द घालण्याचा आग्रह धरला त्याचे कारण असं- तुष्टाः द्विजा नष्टाः, हे सूत्रवाक्य आहे. संतोष व समाधान झाले की उद्योग थांबतो. " पुढील आठवड्यात शिष्टमंडळाचे इतर लोक म्हणजे पटेल खापर्डे वैगैरे लोक परत आले. त्यानी आपल्या भाषणात बेझंटबाईवर विशेष टीका केली. नंतर ता. १३ रोजी पुण्यास जाहीर सभा भरली. या सभेत केळकरानी व्याख्यानात अमृतसरची सर्व हकीकत सांगितली. शेवटी अध्यक्ष या नात्याने बोलताना टिळकानी सांगितले की "बेशंटबाईनी आपले धोरण वरचेवर बदलले आहे. पण त्यांचे म्हणणे बहुमताला पटत नसेल तर त्यानी रागावून काय उपयोग ?” दिवाण- गिरी पत्करण्यासंबंधाने टिळक म्हणाले “सरकार शहाणे असेल तर पुढे जे दिवाण नेमावयाचे ते स्तुतिपाठक न नेमता योग्य दिसेल ते स्पष्टपणे बोलणारे नेमील व या दिवाणानाहि लोकांचे व सरकारचे आराधन करण्याचे विकट काम यापुढे करावे लागेल. " ता. १ फेब्रुवारी रोजी पुण्यास स्वराज्यसंघाच्या कार्यकारी मंडळाची सभा झाली. तीत नवीन सुधारणांच्या दृष्टीने संघाचे किंबहुना राष्ट्रीय पक्षाचे धोरण काय असावे यासंबंधी बरीच वाटाघाट होऊन काही तरी निश्चित योजना शक्य तितक्या लौकर प्रसिद्ध करावी असे ठरले. टिळक पुण्यास आल्यावर ते विश्रांतिकरिता काही दिवस गावाबाहेर घर घेऊन राहिले होते. या अवधीत पुण्यातील एका वादात त्याना सहजासहजी पडावे लागले. पुणे म्युनिसिपालिटीत सक्तीच्या प्राथ- मिक शिक्षणाचा प्रश्न निघाला तेव्हा नेमस्तपक्षाने असा आग्रह धरिला की मुलगे व मुली यांच्याकरिता अशा शिक्षणाची योजना एकदमच करावी. उलट राष्ट्रीय- पक्षाचे म्हणणे असे की ही योजना फार खर्चाची होणार म्हणून प्रथम मुलग्यां- पुरतीच ही योजना करावी आणि नंतर काही दिवसानी मुलींच्याकरिताहि करावी. हा वाद म्युनिसिपालिटीबाहेरहि सुरू झाला. नेमस्तपक्षाने असा बहाणा चालविला की राष्ट्रीयपक्ष हा स्त्रीशिक्षणविरोधी आहे. म्हणून त्यानी ब्राहाणेतरपक्षाची मदत घेऊन शहरातील सेवासदन वगैरे संस्थांचे साहाय्य घेऊन बरीच चळवळ केली. गावात दोन्ही वर्गांचे शिक्षण एकदम करावे अशी चळवळ करण्याकरिता स्त्रियानी एक मोठी मिरवणूक काढली व किर्लोस्कर थिएटरमध्ये सभा झाली त्यात उभय- पक्ष हजर असल्याने बराच कडाक्याचा वाद झाला. राष्ट्रीय पक्षाने या सभेस टिळकानाहि आणले. यामुळे त्या संधीचा फायदा घेऊन पूर्वी मानपत्राच्या वेळी टिळकाना विरोध करण्याची जी शिल्लक बाकी उरली होती ती नेमस्तानी व ब्राह्मणेतर पक्षाने यावेळी वसूल करण्याचा प्रयत्न केला. त्यात दंगलीशिवाय दुसरे काही निष्पन्न झाले नाही.