पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/४७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

३६ लो०. टिळकांचे चरित्र भाग १ दुरुस्ती झाली ती अशी की प्रतिनिधि निवडावयाचे ते कोणत्याहि नोंदलेल्या सभेचे सभासदच पाहिजेत असे नाही, आणि १९९५ पूर्वी दोन वर्षे अस्तित्वात असलेल्या संस्थांना पंधरापर्यंत प्रतिनिधि स्वतंत्रपणे आपल्या हक्काने निवडून देता यावे. पण अलीकडील दोन वर्षात अस्तित्वात येणाऱ्या किंवा यापुढे बनणाऱ्या संस्थांचे काय ? असा प्रश्न निघाला तेव्हा जबाबदार पुढाऱ्यानी असे सागितले की घटनेप्रमाणे कोणत्याहि नव्या संस्थेने नोंदून घेण्याविषयी काँग्रेस कमि- ट्याकडे कळविले असता त्याना या कमिट्यांनी नोंदून घेतलेच पाहिजे. अशा रीतीने उभयपक्षी थोडथोडी देवघेव होऊन राष्ट्रीय पक्षाच्या निम्याअधिक तक्रारी दूर झाल्या. आणि त्या देखील परस्पर नेमस्तांकडूनच. कारण मुंबईच्या सभेला राष्ट्रीय पक्षाचे लोक गेलेले नव्हते. सभेचे वातावरण एकंदरीने उत्साहजनक असल्यामुळे सभेतील ठरावहि सत्यप्रसन्न सिंह यांच्या इच्छेपलीकडे प्रगतीपर झाले. अध्यक्ष सिंह हे पुरे नेमस्त असल्यामुळे त्यांचे भाषण बऱ्याचशा मस्तांनाहि न आवडण्याइतके फिके झाले. शिवाय बेझटबाईनी स्वराज्यावरील मुख्य ठरावाला एक उपसूचना आणली होती ती त्यानी आपल्या अधिकारात नामंजूर केली. बाईची सूचना अशी होती की 'हिंदुस्थानाला वसाहतीसारखे स्वराज्य देण्याची व तदनुसार स्वराज्ययोजना करण्याची वेळ आता आली आहे' असे प्रास्ताविक शब्द स्वराज्यविषयक ठरावाच्या प्रारंभी घालावे. ही सूचना बेकायदे- शीर ठरविण्याचे कारण असे सागण्यात आले की होमरूल हे ध्येय असले तरी काँग्रेसच्या उद्देशात ते बसत नाही. पण यामुळे स्वतः बाई निराश झाल्या नाहीत व इतर होमरूलवालेहि निराश झाले नाहीत.