पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/४७८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

४३ लो० टिळकांचे चरित्र भाग ६ नंदन ज्याने त्याने उठून करण्यात काही वेळ गेला. तसेच जालियनवाला बागे- संबंधाने नाव निघताच सगळा समाज उठून उभा राहिला व बागेतील कत्तलीचे स्मारक करावे म्हणून पंडित मदनमोहन यानी ठराव आणला तेव्हा पांच मिनिटात एक लाख रुपयांचे आकडे पडले. तिसरे दिवशी राष्ट्रीय समेत बादशहांचा जाहीरनामा व युवराजाचे स्वागत याना अनुकूल असे ठराव करण्यात आले. अशा स्थितीतहि मतभेद थोडासा होताच. पण तो केवळ सुधारणांच्या ठरावा- संबंधाने होता. डायर - ओड्वायर यांच्यासंबंधाने जे ठराव व भाषणे झाली त्यात कोणाचाच विरोध नव्हता. लॉर्ड चेम्सफोर्ड याना कामावरून दूर करून परत बोलवावे या ठरावाला शर्मा यानी एकट्यानी विरोध केला. पण खरा मतभेद 'सुधारणांच्या कायद्याला असमाधानकारक व निराशाजनक म्हणावे की नाही ? त्यांचा उपयोग करून घेण्यासंबंधाने काय शब्दयोजना करावी ? आणि माँटेग्यू- साहेबांचे आभार मानावे की नाही ?' यापुरताच होता. स्वामी श्रद्धानंद यानी जी दोन दळे किंवा सैन्ये म्हटली त्यांत एका बाजूला नेहरू गांधी मदनमोहन बेझंटवाई शास्त्री वगैरे लोक होते. आणि दुसन्यात टिळक दास पाल वगैरे लोक होते. एका पक्षाचे म्हणणे सुधारणांच्या कायद्याला दूषणास्पद असे शब्द लावू नयेत. दुसऱ्याचे म्हणणे ते शब्द जरूर घालावेत. विशेषणांचा वाद होता. याहिपेक्षा कमी वाद पुढे कसे वागावे याबद्दल होता. व सर्वात कमी वाद माँटेग्यू साहेबांच्या आभारप्रदर्शनाबद्दल झाला. केव्हा एका बाजूचा खल गांधीच्या बिन्हाडी दुसऱ्या बाजूचा खल टिळकांच्या बिन्हाडी व केव्हा दोन्ही पक्षाचे पुढारी एकत्र बसून खल होई. टिळकांचे म्हणणे, पूर्वीच्या राष्ट्रीय सभानी हे शब्द योजलेच आहेत तेव्हा ते आपणहि योजावेत. उलट पक्षाचे म्हणणे ते शब्द ठेवल्याने सुधारणांचा उपयोग करण्याविषयी जो ठराव आपण करीत आहो त्याचा तेजोभंग होतो. गांधीना वाटले की 'निराशा' शब्द घातल्याने पुढे सुधारणा टाकून देऊन तुम्ही संन्यस्तवृत्ति पत्करणार असे ध्वनित होते. याच्या उलट टिळक म्हणत की मी बोलून चालून कर्मयोगी आहे. निराशेने माझ्या कर्मयोगाला उलट जोर चढतो. तुम्हा आम्हा दोघानाहि सुधारणांचा उपयोग करून घेणे ही गोष्ट मान्य आहे ती ठेवू. आणि याच योजनेसंबंधाने पूर्वीच्या राष्ट्रीय सभेने दिलेली विशेषणेहि कायम ठेवू. या वादात गांधीपेक्षाहि बेझंट- बाईनी नेमस्तांच्या ऋणानुबंधाकरिता अधिक हट्ट धरला. पण वास्तविक त्यानीच पूर्वी या शब्दाना अनुमति दिली होती. आम्हा लोकांच्या संवयीप्रमाणे हा वाद पक्के दोन दिवस सुरू होता. आणि तो न तुटता मते मोजून निकाल करण्याची वेळ येणार असेहि दिसू लागले. पण शेवटी सुदैवाने तडजोड निघून टिळकांच्या म्हणण्याप्रमाणे सुधारणांचे गौणत्व दर्शविणारी विशेषणे ठरावात आली. टिळक व गांधी यांच्या म्हणण्याप्रमाणे सुधारणांचा पुढे उपयोग करून घ्यावा हा भाग आला. आणि बेझंटबाईच्या म्हणण्याप्रमाणे माँटेग्यू साहेबांचे आभार मानण्याचाहि