पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/४७७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भांग ६ अमृतसरची कॉंग्रेस ४२ आहे. कारण प्रत्यक्ष लो० टिळक महाराजानी आपल्याला जे मिळाले आहे ते स्वीकारा व बाकीच्या हकाबद्दल सनदशीर चळवळ जोराने चालू ठेवा अशी या बाबतीत सीमा घालून दिली आहे. हिंदुस्थानात राष्ट्रीय भावनांचा प्रसार करणाऱ्या आदिपुरुषात टिळक महाराजांची गणना प्रमुख स्थानी केली जाते. असा कोण भारतसुपुत्र आहे की ज्याने आपल्या मातृभूमीच्या अब्रूच्या संरक्षणाकरिता बहा- दूर टिळकांपेक्षाहि अधिक कष्ट सहन केले आहेत ? मातृसेवक सेनेतील सैनिक आपल्या बुढया सेनापतीने घालून दिलेल्या अनुशासनाला मान देऊन त्यांच्यापुढे शिर नमविण्याला तयार नाहीत काय ? सभेतील उत्साह व वाद यानंतर अध्यक्ष मोतिलाल नेहरू यांचे सुधारणांच्या त्यागाविरुद्ध असे भाषण झाले. त्यानी प्रथम बादशाही जाहीरनाम्याचा उल्लेख 'दुःखांधःकारातील एक सूर्य किरण' या शब्दानी करून पंजाबातील चळवळ अत्याचार व सत्याग्रह यांचे समा- लोचन केले. जुलुमाचा निष्कर्ष म्हणून त्यानी एका वाक्यात असे गणित सांगि- तले की एकशे आठ इसमाना फांशीची शिक्षा सांगण्यात आली आणि सर्व कैद्यांच्या शिक्षेच्या वर्षांची बेरीज केली तर ती सात हजार तीनशे एकाहत्तर वर्षों- हून अधिक भरेल ! नंतर सुधारणांच्या कायद्याला उद्देशून ते म्हणाले "काँग्रेसच्या मागणीप्रमाणे हा कायदा झालेला नाही. तथापि या कायद्याने जे दिले आहे त्याबद्दल तुच्छता दाखविणे योग्य नाही. या कायद्याने काही सत्ता आम्हास दिली आहे हे आम्ही कबूल केले पाहिजे. शिवाय देशसेवेचे नवीन मार्गहि खुले झाले आहेत. आम्हास मिळाले आहे त्याचा उपयोग करून घेणे हे आमचे कर्तव्य आहे. आम्हाला जे हक्क मिळाले पाहिजेत त्याबद्दल चळवळहि सुरू ठेवली पाहिजे. " सभेचा दुसरा दिवस म्हणजे रविवार ता. २७/२८ या सर्व दिवसभर विषयनियामक मंडळाचे काम सुरू होते. कारण त्यांत वादाच्या गोष्टी बऱ्याच होत्या. या वादाच्या वेळी प्रतिनिधींची मनःस्थिति उल्लसित अशी होती व दिवसेदिवस नवीन नवीन उत्साद येण्यासारख्या गोष्टी घडत होत्या. काँग्रेस सुरू असताच अल्लीबंधूंना सोडल्याची तार आली. टिळक व बिपिन पाल यांच्यावरील पंजाबात शिरण्याची बंदी उठली नव्हती. तथापि 'मी राष्ट्रीय सभेला जात आहे' असे त्यानी पंजाब सरकारला कळवून ठेवले होते. यामुळे त्यानी व दिल्ली कंमि- शनरनी त्यांची मनाई दूर केली होती. तिसरे दिवशी गांधी हे सरकारी अत्या- चाराचा निषेध करीत असता दिवाण मंगळसेन व लाला दुनिचंद हे तुरुंगातून सुटून सभेत येऊन दाखल झाले. व रुचिराम सहानी है जनरल डायर संबंधाने सहावा ठराव मांडीत असता अल्लीबंधू सभेत येऊन दाखल झाले. त्यावेळी सभेचे काम काही वेळ थांबून तुरुंगातून सुटून आलेल्या या पांचसहा लोकांचे अभि- टि० उ... ३४