पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/४७६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

४ १ लो. टिळकांचे चरित्र भाग ६ किसनलाल दुनीचंद राम भुजदत्त आधीच सुटून आल्यामुळे ते सभेला भाले होते व त्याना पाहताच सर्व सभेने त्यांचे अतिशय आनंदाने स्वागत केले. स्वागत मंडळाचे अध्यक्ष स्वामी श्रद्धानंद हे असून त्यानी आपल्या भाषणातील पहिलेच वाक्य उच्चारले ते चिरस्मरणीय होईल. ते म्हणाले " या महासभेच्या शृंगारलेल्या प्लॅटफॉर्मवर उभा राहून एक संन्यासी प्रतिनिधींचे स्वागत करीत आहे हा या सभेच्या इतिहासातील पहिलाच प्रसंग होय. " आणखी पुढे ते असे म्हणाले, ""राजकीय चळवळीत संन्याशाने भाग घेणे योग्य आहे काय?' असा प्रश्न मला कित्येकानी विचारला. त्याला माझे सरळ उत्तर असे आहे की, ज्या दिवशी या संन्यासाश्रमाचा मी स्वीकार केला त्या दिवशी सर्व जग हा माझ्या कुटुंबाचा परिवार आहे अशी भावना मी धारण केली. आणि जगातील वस्तु- मात्राकडे मी समदृष्टीने पाहू लागलो. म्हणून लोकलज्जा सोडून लोककल्याणात दत्त- चित्त होण्याचे व्रत मी धारण केले. या पवित्र वेदीवर उभे राहण्याचे माझे दुसरे कारण असे की, ज्या नररत्नानी भारत मातेचा माथा उज्ज्वल राखण्याकरिता फांशीची जन्मठेपीची अशाहि शिक्षा सोसल्या त्यांच्या धर्मपत्न्यानी, आपल्या पतीचे आत्मे काँग्रेसचा हा महोत्सव बंद न पडेल तरच शांत होतील अशी इच्छा प्रगट करून मजसारख्या भिक्षूजवळ या कार्याची उलट भिक्षा मागितली तेव्हा मला त्यांच्या आज्ञेला मस्तक नमविणे प्राप्त झाले. ' कुर्वनेवेह कर्माणि जिजीविषेच्छतङ् समाः अशी वेदाची आज्ञा असल्यामुळे संन्यासाश्रम घेतला तरी केवळ कर्तव्य म्हणून मी हे काम पत्करले, निर्भयपणे व निश्च- याने सत्यरक्षणाची वेळ आता आली आहे. सत्यपालन हेच अशा कठीण प्रसंगी संन्यासी सांप्रदायाचे कर्तव्य होय. सर्व जगाची सेवा करण्याचा विडा ह्या संन्या- साश्रमाने उचलला आहे. श्रद्धेमध्ये माझा सर्व आनंद साठविला असून भारत- मातेच्या संतानाबरोबर माझेहि भवितव्य उज्ज्वल होईल असे मनोदेवता मला सांगत आहे ! " सुधारणा बिलाला उद्देशून स्वामीजी म्हणाले " कोणाच्याहि प्रयत्नाने का होईना - नरमपक्षाच्या शहाणपणामुळे किंवा गरमपक्षाच्या जोरामुळे या सुधारणा आज आम्हाला मिळाल्या आहेत. नरम व गरम ही दोनहि दळे त्यांचा स्वीकार करण्यास आज तयार आहेत. असे असता क्षुल्लक मतभेद उकरून काढून दोघा- नीहि आपापल्या ठिकाणी अडून बसून राहणे योग्य नाही. सुधारणेच्या योजनेचा स्वीकार करण्याच्या बाबतीत एकमत झाल्यावर आता झगडा तो काय राहिला ?" नंतर सुधारणांचा त्याग करावा असे म्हणण्याचा ध्वनी जो थोडासा कोठून उमटत होता त्याला उद्देशून स्वामी म्हणाले " जर हिंदुस्थानातील सर्व जनता एकमत होऊन आज मिळालेल्या अधिकारांची उपेक्षा करण्यास तयार असेल तरच या योजनेचा आपण स्वीकार करणार नाही असे म्हणण्यात काही तरी अर्थ राहिला असता. परंतु यावेळी तर ही गोष्ट असंभवनीय आहे. झगडा मागेच संपला