पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/४७५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग ६ अमृतसरची काँग्रेस ४० अत्यंत विरुद्ध होते. इतके असताहि बादशहानी माफी दिली तर त्याबद्दल त्यांचे आभार मानावयास नकोत काय ? आणि आभार मानण्याचे एकदा ठरल्यावर ते प्रथम कोणी मानावयाचे १ होमरूल लीगने राष्ट्रीय सभेने किंवा नेमस्तानी ? टिळकांच्या तारेत केवळ जाहिनाम्याचाच नव्हे तर माफीबद्दलहि जो मुद्दाम निराळा उल्लेख केलेला आहे त्याचे कारण यावरून दिसून येईल. " कित्येक बेजबाबदार व व्यवहारशून्य जहालांचे असे म्हणणे आहे की माफी देताना बादशहानी जी भाषा वापरली आहे ती आम्हास मान्य नसल्यामुळे आभार मानण्यास आम्ही तयार नाही. पण हे खरे जहाल किंवा नेमस्तहि नव्हत असे त्यास मोठ्या दुःखाने कळविणे प्राप्त आहे. तुम्हाला माफी नको तर खुशाल रहा तुरुंगात ! नको कोणी म्हटले आहे ? नोकरशाहीच्या जुलमाने राजकीय कैदेत गेलेले लोक तुरुंगाबाहेर काढणे हे प्रत्येक देशहितचिंतकाचे पहिले कर्तव्य होय व यासाठीच बादशहास लोकानी व कॉंग्रेसने अनेक वेळा विनंति केलेली होती. ही विनंति आता बादशहानी मान्य केली आणि स्वराज्याचे स्पष्ट अभि- वचन दिले इतकेच नव्हे तर सर्व राजकीय कैद्यास माफीहि देण्यास फर्माविले. आता या यांच्या जाहिरनाम्यातील शब्दाबद्दल तक्रार करणे नुसत्या फाजीलपणाचे लक्षण होय. कदाचित् असेहि घडेल की हिंदुस्थानसरकार काही बाबतीत बाद- शहांच्या जाहिरनाम्याप्रमाणे माफी देण्यास तयार होणार नाही. कारण राणीच्या जाहिरनाम्याला अशक्य सनद म्हणणारे व्हाइसरॉयसाहेब अद्याप जिवंत आहेत. पण असे घडले तरी जाहिरनाम्याची किंमत त्यामुळे कमी होत नाही. जाहिरना- म्याच्याच जोरावर आम्ही सरकारशी पुनः भांडू पण असले प्रसंग पुढे उप- स्थित होतील अशा मनच्याच कल्पना करून आज आम्हास प्राप्त झालेल्या आश्वासनाची किंमत कमी करणे हे अत्यंत गैरमुत्सद्दीपणाचे अविचाराचे आणि अप्रामाणिकपणाचे लक्षण होय. " टिळकांविषयी प्रामाण्यबुद्धि टिळक अमृतसरला पोहोचले तेव्हा तेथेहि त्यांची फारच मोठी मिरवणूक निघाली. अमृतसर येथे आधीच थंडी फार. त्यातून यापूर्वी दोन दिवस पाऊस पडल्याने थंडीचा जोर फारच झाला होता. तरीहि लोकानी या थंडीकडे न पाहता टिळकांची मिरवणूक अध्यक्षांची मिरवणूक वगैरे सर्व गोष्टी उत्साहाने पार पाडल्या. काही नेमस्त पुढाऱ्यानी आपण राष्ट्रीय सभेला हजर राहत नाही असे आगाऊ कळविले होते. तथापि ना. शास्त्री देवधर शर्मा वगैरे त्यांची मंडळी हजर होती. शिवाय गांधी व त्यांची मंडळी बेझंटबाई व त्यांची मंडळी जिना हसन इमाम अजमलखान महमदाबादचे राजेसाहेब वगैरे मुसलमान पुढारी सर दिनशा पेटीट दास चक्रवर्ति विजयराघवाचार्य बमनजी वगैरे अनेक पुढारी हजर होते. लष्करी कायद्यान्वये शिक्षा झालेल्या लोकापैकी डॉ. किश्वलू सत्यपाल हर-