पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/४७४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

३९ लो० टिळकांचे चरित्र भाग ६ आपण होऊन कधी अडथळा आणला नाही किंबहुना आणणेहि शक्य नाही. आजपर्यंत जो अडथळा आणि विरोध झाला तो सर्व नोकरशाहीचा. ही नोकर- शाही जर सहकारिता करावयास कबूल असेल व करील तर त्याला प्रतियोगि- त्वाच्या नात्याने म्हणजे जबाबाला प्रतिजबाब म्हणून लोकहि सहकारिता दाख- विण्यास तयार आहेत असे बादशहास आश्वासन द्या असा टिळकांच्या या तारेचा अर्थ होता. पण येवढ्या खोल पाण्यात शिरावे कोणी ! "सहकारिता नेहमीच दोहो बाजूकडे सापेक्ष असते. त्यातून जी गोष्ट प्रजेच्या कल्याणाची तीत सहकारिता करा हे प्रजेस सांगावयासच नको. स्वतःच्या कल्या णास आडकाठी घालणारा मनुष्य पशु समजला पाहिजे. म्हणून सहकारित्वाचा उपदेश प्रजेस करणे योग्य नव्हते. या कामात आजपर्यंत जर कोणी आडकाठी घातलेली असली तर ती नोकरशाहीने. यासाठी बादशहांच्या आज्ञेचरहुकूम सह- कारिता करण्यास नोकरशाहीची तयारी असल्यास लोकहि आपल्या बाजूने सह- कारिता करण्यास तयार आहेतच. नसल्यास मात्र विरोध करावा लागेल असा टिळकांच्या तारेचा खरा मथितार्थ आहे आणि याच अर्थाचे शब्द जर काँग्रे- सच्या ठरावात पहिल्यापासूनच योजण्यात आले असते तर मग त्यास कोणी विरोध केला नसता. पण हे तत्त्व पंडितजीनी आपल्या भाषणात जरी कबूल केले होते तरी त्यानी पुढे आणलेल्या ठरावात 'सहकारिता' येवढाच शब्द वापरला अस- ल्यामुळे वाद माजला. आणि सहकारीतेच्या स्वरूपाबद्दल काहीच न बोलता नव्या अॅक्टान्वये आपल्या उन्नतीसाठी काम करा ( Work ) येवढ्यावरच अखेर तडजोड करण्यात आली. "टिळकानी आपल्या तारेत ज्या सहकारितेचा उल्लेख केला आहे ती प्रति- योगी स्वरूपाची आहे हे जरी कबूल केले तरी ही तार इतक्या लवकर करण्याचे कारण काय, असे एखादा घमेंडानंदन विचारू शकेल. या प्रश्नास एक उत्तर वर दिलेच आहे. होमरूल लीगचे मुख्य मुख्य अधिकारी अनायासेच गाडीत जमलेले होते, आणि त्या लीगपुढे जर केव्हातरी हा विषय चर्चेस येणारच तर मग तो लवकर आलेला काय वाईट ? पण याहीपेक्षा बलवत्तर असे दुसरेद्दी एक कारण आहे. पंजाब प्रकरण तर आता उपस्थित झाले. पण त्यापूर्वीपासून राज- कीय कैद्याना पूर्ण माफी मिळाली पाहिजे अशा मागण्या लोकानी व राष्ट्रीय सभेने हि वेळोवेळी केल्या होत्या. लखनौस तर बादशाही जाहिरनाम्यात स्वराज्या- चाहि उल्लेख पाहिजे अशी स्पष्ट मागणी केलेली होती. आणि होमरूल लीगनेहि हेच ठराव मान्य केलेले होते. इतकेच नव्हे तर काँग्रेस आणि होमरूल लीग यांच्या वतीने विलायतेस जी डेप्युटेशने गेली होती त्यानी राजकीय कैद्यास सर्व- साधारण माफी देऊन शांतता करण्याची हीच वेळ आहे असे माँटेग्यू साहेबास सुचविले होते. मवाळ या गोष्टीला अनुकूल नव्हते, माँटेग्यू साहेबांच्या कौन्सिला- तील बहुमत प्रतिकूल होते, आणि हिंदुस्थानसरकार तर या गोष्टीस बोलूनचालून