पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/४७३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग ६ अमृतसरची काँग्रेस ३८ ट्रेनची व्यवस्था करण्यात आली होती. टिळकांच्या बरोबर त्यांच्या पक्षातील बहुतेक पुढारी हजर होते. ही स्पेशल ट्रेन वी. वी. सी. लाईनने गेली. ती वाट चालत असता मधल्याच एका स्टेशनवर त्याना बादशाही जाहीरनामा निघालेला वाचावयास मिळाला. तेव्हा त्याला ताबडतोब उत्तर द्यावे म्हणून टिळकानी पुढच्या एका स्टेशनावरून तार पाठविली. ही तार हा वादाचा एक विषय होऊन लोकापुढे आली तेव्हा झालेली हकीगत स्वतः टिळकानी लिहून केसरीत प्रसिद्ध केली म्हणून ती त्यांच्याच शब्दानी पुढे दिली आहे. प्रतिसहकारितेचा जन्म 66 'ज्या तारेबद्दल येवढी चर्चा चाललेली आहे ती तार तरी काय आहे हे पहिल्याने पाहिले पाहिजे. कारण यावरील टीकाकारांची दृष्टि धांदलीत क्षुद्र मनो- विकाराने अंध होऊन साधे इंग्रजी शब्दहि त्याना न कळता त्यानी या तारेची सपशेल खोटी भाषांतरे प्रसिद्ध केली आहेत. टिळकानी तारेत मानलेले आभार हे बादशहाचे आहेत. माँटेग्यूसाहेबांचे नव्हत अगर व्हाइसरॉयसाहेबांचेहि नव्हत. बादशहास काहीहि मजकूर कळवावयाचा असला तरी तो त्याचे मंत्री चिटणीस किंवा व्हाइसरॉय यांचे मार्फतच कळवावा लागतो. म्हणून बादशहास उद्देशून केलेल्या तारा माँटेग्यू व व्हाइसरॉय यांच्याद्वारे पाठविण्यात आल्या असल्या तरी त्यातील मजकूर त्या दोघासहि उद्देशून नव्हता. "माँटेग्यू आणि व्हाइसरॉय यांच्या द्वारे बादशहाकडे जी तार पाठविण्यात आली ती पुढे लिहिल्याप्रमाणे:- "Please convey to His Majesty grateful and loyal thanks of Indian Home Rule League and the people of In- dia for Proclamation and amnesty and assure him of res- ponsive cooperation." अर्थः- “ 'बादशहास मेहेरबानीने असे कळवा की जाहिरनामा आणि माफी याबद्दल इंडियन होमरूल लीग आणि हिंदुस्थानचे लोक त्यांचे कृतज्ञपणे आणि राजनिष्ठपणे आभारी आहेत आणि ( या बाबतीत ) प्रतियोगी सहकारिता (लोकाकडून) मिळेल असेही बादशहास आश्वासन द्या. , या तारेत आभार बादशहांचे आहेत, आणि तेहि त्यांचा जाहिरनामा व सर्वसाधारण माफीबद्दल असून सहकारित्वाचे वचनही प्रतियोगी स्वरूपाचे आहे. Responsive ( प्रतियोगी ) हा शब्द सहकारितेला प्रायः लावीत नाहीत हे खरे. पण त्याच कारणामुळे प्रस्तुतच्या तारेतील या शब्दाकडे टीकाकारांच विशेष लक्ष जावयास पाहिजे होते. बादशहांच्या जाहीरनाम्यात सहकारित्वाचा उपदेश नोकरशाही आणि प्रजा या दोघासहि केलेला होता. टिळकांच्या मते प्रजेस हा उपदेश करणे जरूर नव्हते. कारण प्रजेच्या कल्याणाच्या गोष्टीत प्रजेने