पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/४७०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

३५ लो० टिळकांचे चरित्र भाग ६ येवढेच की या पार्लमेंटरी कमिटीच्या त्या स्वयं-सेक्रेटरी झाल्या. आणि कमि- टीच्या नावाने इतर शिष्ट-मंडळावर छाप बसविण्याचा प्रयत्न करू लागल्या. नाम- दार पटेल यानी त्यातील इंगित तेव्हाच ताडले आणि राष्ट्रीय सभेच्या तर्फे स्वतंत्र उद्योगास सुरुवात केली. बाईच्या या करण्यात आणि समेट होत असल्यास स्वतः मागे रहाण्यास देखील तयार असलेल्या टिळकांच्या वर्तनात कोणता फरक आहे हे आता सांगावयास नको. राष्ट्रीय सभेला मागे टाकून जे काय केले ते मी केले असे एकाला दाखवावयाचे होते आणि दुसऱ्यास स्वतः मागे राहून राष्ट्रीय सभा पुढे ढकलावयाची होती. 'ब्रिटन ॲन्ड इंडिया' या संस्थेमार्फत भरलेल्या इंडि- यन कॉन्फरन्सची अगर आल्बर्ट हॉलमध्ये भरलेल्या बड्या सभेची विलायतेतील सर्व खरी हकीकत चिपळूणकर यास माहीत नाही हे ते स्वमुखानेच कबूल करितात. ती हकीकत जर त्यास माहीत असती आणि त्याबद्दलचे सर्व अस्सल कागद टिळकापाशी अद्यापहि आहेत तर हल्लींच्याप्रमाणे सर्वस्वी चुकीची विधाने कर- ण्यास वासुदेवरावजी तयार झाले नसते अशी आमची खात्री आहे. 'इंडियन कॉन्फरन्स' ची राजकीय शाखा बेशंटवाईच्या अध्यक्षतेखाली ता. ४ ऑक्टोबर १९१९ रोजी म्हणजे जॉईन्ट कमिटीचा रिपोर्ट होण्यापूर्वीच भरली होती व त्यात माँटेग्यूसाहेबाना उचलून धरण्याकरिता प्रथम असा ठराव यावयाचा होता की " सर्व प्रागतिक शिष्टमंडळांच्या मागणीत जे मुद्दे सर्वसाधारण असतील ते सरकारने स्वीकारावे. " अंकगणित किंवा बीजगणिताची ज्यास्त ओळख असेल त्यास यातील डावपेच लवकर कळून येतील. समजा की जांची मागणी ५० डिग्रीच्या वर आहे त्याना आपण प्रागतिक म्हणू आणि यापैकी एकाची मागणी ६० डिग्री आहे दुसन्याची ७५ आहे व तिसन्याची १०० डिग्री आहे. तर ६० ७५ व १०० यात ६०च सर्वसाधारण होणार ७५ नाहीत व १०० हि नाहीत. तात्पर्य राष्ट्रीय सभेची मागणी सर्वात अधिक म्हणजे १०० डिग्रीची असल्यामुळे ती सोडून देऊन बाईची किंवा नेमस्तांची कमी मागणी कबूल करा असा या ठरावाचा अर्थ होत होता. हा अर्थ टिळक पटेल खापर्डे ( या सर्वास या परिषदेस आमंत्रण होते ) यांच्या लक्षात आल्यावर त्यानी या ठरावाचा आगाऊच निषेध केला व त्यामुळे परिषदेचे अध्यक्ष म्हणजे बेशंटवाई यास अखेर या सभेत कोणतेच ठराव पास करावयाचे नाहीत असे सभेच्या प्रारंभीच जाहीर करावे लागले. आणि वरील ठराव करण्याकरिताच बोलाविलेल्या परिषदेत नुसत्या शुष्क व्याख्यानाखेरीज काहीएक काम झाले नाही. दुसरी गोष्ट आल्बर्ट हॉल- मधील सभेची. या सभेच मि. लॅन्सबरी हे अध्यक्ष होते व ती सभा बेझंटवाई- च्याच उद्योगाने व खर्चाने भरविण्यात आली होती. त्यात अखेर स्वयंनिर्णयाचा व स्वराज्याचाच ठराव पास झाला. पण त्याला जोडूनच माँटेग्यूसाहेबांच्या रिफॉर्म-बिलाचे अभिनंदन करावयाचा बाईचा प्रथम विचार होता. हा विचार टिळकानी मि. लॅन्सवरी यांची आगाऊ भेट घेऊन रहित करविला.