पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/४६९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग ६ दोन अप्रिय वाद ३४ मताने मंजूर झालेले ठराव हेच खऱ्या राष्ट्रीय मताचे निदर्शक होत असे प्रति- पादन करीत होते. दिल्लीत आपले मत ग्राह्य न ठरल्यामुळे बाई राष्ट्रीय सभेवर रुसलेल्या होत्या आणि काही झाले तरी काँग्रेसचे ठराव हेच या बाबतीत मुख्य होत असे टिळकांचे सांगणे होते. थोडक्यात सांगावयाचे म्हटल्यास कॉंग्रेसच्या शिष्टमंडळाने किंवा टिळकानी विलायतेस जे प्रयत्न केले त्याचा कॉंग्रेसचे ठराव हा केन्द्र होता आणि बाईनी किंवा त्यांच्या नेतृत्वाखाली विलायतेस गेलेल्या शिष्टमंडळाने तिकडे जे प्रयत्न केले त्याचा स्वतः बाई याच केन्द्र होत्या असे म्हटले तरी चालेल. बाई मॉन्टेग्युकडे झुकल्या होत्या तर टिळक व कॉंग्रेसचे शिष्टमंडळ राष्ट्रीय सभेकडे झुकले होते. मॉन्टेग्युसाहेवाचे कृतज्ञतापूर्वक आभार मानणे किंवा स्तुति करणे हे बाईस पहिल्यापासूनच इष्ट वाटत होते तर स्वयं- निर्णयाच्या तत्त्वावर राष्ट्रीय सभेच्या ठरावास माँटेग्युसाहेबानी जितका मान द्याव - यास पाहिजे होता तितका दिलेला नाही असे टिळकास व काँग्रेसच्या शिष्टमंड- ळास ब्रिटिश जनतेपुढे उघड सिद्ध करून दाखवावयाचे होते. विलायतेत टिळक 'मॉडरेट्' झाले होते असे बाई आता म्हणतात. पण राष्ट्रीय सभेच्या ठरावात रेसभर देखील फरक न करिता ते ठरावच सयुक्तिक न्याय्य आणि खऱ्या मुत्स- द्दीपणाचे आहेत असे समर्पक रीत्या पण ठासून प्रतिपादन करणे हेच जर बाईच्या मते टिळकांच्या विलायतेतील ' मॉडरेट ' पणाचे लक्षण असेल तर टिळक तो दोष किंवा आरोप सुखाने माथी घेण्यास तयार आहेत असे चिपळुणकरासच काय पण सर्व लोकास आम्ही टिळकातर्फे कळवितो. मवाळास किंवा बाईस टिळकांची हो कृति पसंत पडत नाही हा काही टिळकांचा दोष नव्हे, राष्ट्रीय सभेचा मान राखावयाचा का आपला हेका अगर अहंकार पुरवावयाचा असा प्रत्येक शिष्ट मंडळापुढे प्रश्न होता. आणि बाईचा किंवा इतर शिष्ट-मंडळाचा कित्ता न गिरवता टिळकानी आणि काँग्रे- सच्या शिष्टमंडळाने, पुढे किंवा मार्गे न जाता, राष्ट्रीय समेचच मत ब्रिटिश जनतेकडून व मजूर पक्षाकडून मान्य करून घेतले हीच नामदार पटेल यांच्या नेतृत्वाखाली वागणाऱ्या टिळक-खापर्ज्याची मुख्य कामगिरी होय. कोणी म्हणेल की, बाईचे व टिळकांचे मार्ग जरी भिन्न असले तरी ज्याअर्थी मतभेद होणे हे स्वाभाविक आहे, त्याअर्थी केवळ मार्गभेदास्तव बाईवर इतके तुटून पडण्याची जरूर नव्हती. बाई केवळ मतभेदावरच जर संतुष्ट राहिल्या असत्या तर वरील शेक्स काही अवकाश मिळण्याचा संभव होता. पण तसा प्रकार घडून आला नाही. अखेर राष्ट्रीय समेशी व तिच्या कार्याशी बाईनी विरोधच केला असे म्हणण्यास सबळ पुरावा आहे. बाईनी पार्लमेंटरी कमिटी स्थापन केली असे काहींचे म्हणणे आहे. परंतु खरे पाहता बाई विलायतेस जाण्यापूर्वी कित्येक महिने टिळकानी ही कमिटी स्थापन करून तिला राष्ट्रीय सभेच्या मागण्यांची पूर्ण ओळख करून दिली होती. बाईनी विलायतेस आल्यावर जे कार्य केले ते