पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/४६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग १ मुंबईची राष्ट्रीयसभा ३५ 'पुरुषसिंह' आहे असेच त्यांचे वर्णन करावेसे वाटे. पण वरचे पुष्कळसे गुण असूनह ते लोकाना अप्रिय होण्याला कारण त्यांचा मानी स्वभाव. जो त्यांचा गुण साहेब लोकाशी वागताना परिणामकारक होई तोच स्वकीयाशी वागताना अप्रीति उत्पन्न करो. टिळकानी त्यांच्यासंबंधाने असे म्हटले आहे की त्यांचा हा बेसुमार आढ्यताखोर ताठरपणा व मानधन स्वभाव यांचा अतिरेक होत असला तरी या गोष्टी आम्हा लोकांच्या स्वभावात इतक्या कमी आहेत की त्यांच्या अवगुणाची गणना कदा- चित् गुणातहि करावी लागेल. मुंबईतील 'पंच' हा त्यांचे चित्र काढताना नेहमी सिंहाची आयाळ लावून काढी. आणि लिओ म्हणजे सिंह आणि फेरोज - शाहा मेथा हे शब्द जवळ जवळ समानार्थक ठरले होते. (९) मुबईची राष्ट्रीयसभा "समोरचा मोठा दरवाजा लावून म्हणता हे तुमचे कोण ऐकेल ? मुंबईस भरणाऱ्या सभेच्या तोंडीच फेरोजशाहा वारले ही मुंबईकरांची मोठीच हानी झाली. मुंबईच्या काँग्रेसला टिळकानी यावे अशी सूचना कित्येक नेमस्त पले करू लागली. त्याला टिळकानी उत्तर दिले की घेता आणि माडीवर चढून मग घरात या असे मद्रासेस ज्या सूचना करण्यात आल्या त्यांचा विचार व निर्णय सभेच्या आधी दहा बारा दिवस झाला तरीहि आम्ही येऊ. राष्ट्रीय संस्थेला जर सर्वांची गरज असेल तर तिने नियमाचे दास्य झुगारून द्यावे आणि आपल्या भोवतालचा खंदक भरून काढावा किंवा त्यावर सोयीचा पूल टाकावा.” सुदैवाने यापूर्वी काही दिवस नागपूर प्रांतात उभयपक्षाच्या लोकानी मिळून प्रांतिक परिषद भरविली होती आणि राष्ट्रीय पक्षाच्या म्हणण्याप्रमाणे प्रतिज्ञापत्रक मान्य करण्याऱ्या लोकाना जाहीरसभामार्फत निवडून येण्याला मोकळीक ठेवली होती. अर्थात् प्रांतिक परिषदातून जी गोष्ट होते ती घडवून आणण्याला राष्ट्रीय सभेने खळखळ का करावी असा टिळकांचा सवाल होता. टिळकांचे हे म्हणणे साताऱ्यास नेमलेल्या समेट कमिटीने स्पष्टपणाने लोकापुढे मांडून काँग्रेसकडे व इतर प्रांताकडे पाठविले होते. तसेच पुण्यातील नेमस्त मंडळीनीहि अशी सूचना पाठविली होती कीं जाहीरसभानी निवडलेल्या प्रतिनिधींनी काँग्रेसला यंदा यावे व ते आत आल्यास त्यानी व कन्व्हेन्शन वाल्यानी मिळून समेटाच्या प्रश्नाचा निकाल लावावा. पण मुंबईकरानी तिचाहि अव्हेर केला. उलट पुणेकराना त्यानी असा खलिता पाठविला की काँग्रेस कमि- टीच्या सभासदाशिवाय इतर कोणासहि प्रतिनिधी निवडता येणार नाही. या खलित्याविरुद्ध पुणेकरानी तक्रार करावयाला पाहिजे होती ती केली नाही. पण नगर व सातारा येथील कमिट्यानी ती केली. शेवटी मुंबईकराभोवती सर्व प्रांतां- तील समेटवाल्यांचा वेढा इतका जबरदस्त झाला की काँग्रेसमध्ये एकट्या मुंबई- करांखेरीज समेटाला कोणी विरुद्ध नाही असे उघड दिसून पडले, यामुळे घटनेत