पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/४६८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

३३ लो० टिळकांचे चरित्र भाग ६ गोम त्यांच्या लक्षात आलेली नाही. काळाचा महिमा अगाध आहे व तोच आपणास पुढे लोटीत आहे. या वेळी राष्ट्रीय पक्षास शिव्या देऊन व आपल्या कामाची तारीफ करून सरकारशी अविरोध करणे देशहितदृष्ट्या गैरमुत्सद्दीपणाचे आणि अविचाराचे लक्षण होय. म्हणून असला आचरटपणा सोडून देऊन व आपापसातील मतभेद विसरून ज्याने त्याने आपली क्षेत्रमर्यादा ओळखावी व अनसूयापूर्वक यथाशक्ति देशकार्यास प्रवृत्त व्हावे अशी सर्वपक्षीयासच आमची विनंति आहे. ना. गोखले जेव्हा विलायतेहून १९०५ साली येथे परत आले तेव्हा त्यास मानपत्र देण्याच्या कामी टिळकानी पुढाकार घेतला होता है परांजपे विसरले काय ? टिळक-गोखल्यांचा मतभेद टिळक-परांजप्यांच्या मतभेदा- पेक्षा कमी तीव्र होता असे नाही. पण तसा असताहि जर टिळक प्रसंग- विशेषी तो मतभेद विसरून ना. गोखल्यांचे स्वागत करण्यास तयार झाले तर परांजप्यास तसे करण्यास काय हरकत होती ? क्रोध आणि मत्सर ही नरकाची द्वारे होत असे गीतेत स्वच्छ सांगितले आहे. म्हणून ही द्वारे बंद करण्याचा परांजपे यानी अवश्य प्रयत्न करावा म्हणजे अशी घोडचूक पुनः त्यांच्या हातून घडणार नाही एवढीच त्यास अखेरची विनंति करून आम्ही हा लेख येथे संपवितो. बेझंटबाईच्या अनुयायाना उत्तर बाई विलायतेत गेल्याबरोबर टिळक त्यास प्रथम स्टेशनवर व नंतर त्यांच्या घरीहि भेटले आणि त्यानी विनंति केली की, हिंदुस्थानातील भांडणे हिंदुस्थानांत ठेवून विलायतेत राष्ट्रीय सभेच्या धोरणानेच चालावे हे बरे. बाई अर्धवट कबूल झाल्या आणि प्रथम प्रथम आणि पुढे क्वचित प्रसंगी त्यांचे तसे वर्तनहि होते. पण एकंदरीत नेमस्ताप्रमाणे त्यानीहि काँग्रेसच्या शिष्टमंडळाच्या कार्यास विलाय- तेत विरोध केला असे म्हणणे भाग आहे. आणि ही गोष्ट जर कबूल असेल - मग बाईंच्या भक्तास ती ' वाजवी' म्हणून कबूल असो वा 'वावगी ' म्हणून कबूल असो तर वादच मिटला म्हणावयाचा. कारण अशा तऱ्हेचा विरोध करून पुनः राष्ट्रीय सभेत " मी तुमच्यातीलच " असे म्हणून जाणे कोणासहि युक्त नव्हे, असे मग न्यायतःच प्राप्त होते. असो. बाई आणि टिळक यांच्या विलायतच्या कामगिरीत अंतर पडणे स्वाभाविकच होते, असे वरील पूर्व हकीकतीवरून वाच- कास कळून येईल. राष्ट्रीय सभा चुकली, नेमस्त चुकले हिंदुस्थानचे खरे हित आपल्या स्वतःच्याच सिद्धातांत व्यक्त झालेले आहे असे बाईंना विलायतच्या लोकापुढे मांडावयाचे होते, तर उलटपक्षी टिळक यास राष्ट्रीय सभेची महती स्थापित करावयाची असून राष्ट्रीय सभेचे ठरावच स्वयंनिर्णयदृष्ट्या हिंदुस्थानातील बहुजनसमाजाचे मत होय, असे ब्रिटिश जनतेपुढे मांडा- वयाचे होते. आपल्याला पुढे करून बाई स्वतःच्या मतास अधिक मान देत होत्या तर टिळक क्षणभर आपल्याला बाजूला ठेवून राष्ट्रीय सभेत बहु-