पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/४६७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग ६ दोन अप्रिय वाद ३२ होय असे प्रतिपादन करणाऱ्या या अभिनव लेखकाचे चातुर्य व तर्कशास्त्र अगाध असले पाहिजे यात संशय नाही. सुधारणापक्षीयानी आजपर्यंत काही राजकीय कामगिरी केली असेल तर ती स्वराज्याचे पाऊल मागे हटवण्यात आहे स्वतःची मेषपात्रता गाण्यात आहे किंवा आपल्याबरोबर लोकांच्या आंगीहि मेषपात्रता आणण्याचा प्रयत्न करण्यात आहे. सन १९०६ साली दादाभाई नौरोजी यानी कलकत्त्याच्या राष्ट्रीय सभेत स्वराज्याचे निशाण उभार- ण्यापूर्वीच नव्हे तर तदनंतरहि सुधारकपक्ष मागे मागे हटण्यातच आपले खरे कर्तव्य आहे असे मानीत होता. आज ज्या सुधारणा माँटेग्यू बिलाने आपल्यास प्राप्त होत आहेत त्यापेक्षाहि जरा कमीच सुधारणेचा प्रथम हप्ता मागण्यास सुरु- वात करा असे १९०७ साली राष्ट्रीय पक्षाचे सुरतेस म्हणणे होते. पण त्या वेळी मेथा गोखले वगैरे परांजप्यास शिरसावंद्य असलेल्या सुधारक पक्षाच्या अग्रणीनीच राष्ट्रीय पक्षास हाणून पाडण्यासाठी काँग्रेस मोडून टाकण्याचीहि पर्वा ठेवली नाही. परांजप्यांच्या दृष्टीने त्यानी हे एक मोठे शतकृत्य केले असेल पण पर- स्पर-सुधारणापेक्षा राष्ट्रीय अभिमानासच आम्ही जास्त महत्त्व देत असल्यामुळे आम्हास हे मत स्वीकारता येत नाही. सामाजिक पक्षाच्या मनातून जितक्या सुधारणा हिंदुस्थानात झाल्या पाहिजेत त्यापेक्षा दोन तसू अधिक सुधारणा ब्रह्मी लोकात व हिंदुस्थानातील नेटिव ख्रिस्ती समाजात झालेल्या आहेत. पण हे दोनहि समाज आमच्याप्रमाणेच आज अधोगतीस गेलेले आहेत. स्वाभिमान हुरूप स्वराज्यनिष्ठा हाच राष्ट्राचा खरा जीव होय आणि हा जिवंतपणा जेथे वसत आहे त्या ठिकाणी सुईच्या मागे जसा दोरा तद्वत सामाजिक सुधारणाहि मागोमाग येत असतात अशी इतिहास साक्ष देत आहे. म्हणून राष्ट्रीय पक्ष राजकीय चळवळीस जितके महत्त्व देतो तितके सामाजिक चळवळीस देत नाही. राष्ट्राची सामाजिक प्रगति होऊ नये असे त्यांचे म्हणणे नाही पण ती राजकीय प्रगतीच्या व स्वाभिमानाच्या अनुषंगानेच झाली पाहिजे. राजकीय परवशता फार तर मुळमुळीत विरोधाने स्वीकारून जिवंत सुधारणा होणेच शक्य नाही असे राष्ट्रीय पक्षाचे तत्त्व आहे. व याप्रमाणे तो वागत आहे म्हणून त्याने अमुक सामाजिक गोष्टी केल्या नाहीत तमुक केल्या नाहीत अशी तक्रार करण्यात काही हशील नाही. सुधारक पक्षाला जी आपली कामगिरी वाटते ती जितकी लोकांच्या डोळ्यापुढे आहे तितकीच राष्ट्रीय पक्षाचीहि कामगिरी लोकांस अवगत आहे. म्हणून ना. परांजप्यासारख्याच्या एककल्ली लेखाने किंवा शिव्याशापाने राष्ट्रीय पक्ष बुडणे अशक्य आहे. जगातील सर्व देश स्वातंत्र्याच्या भावनेने प्ररित होऊन आपल्या देशाचा कारभार आपल्या हातात असावा अशा प्रयत्नास कालानुसार लागले आहेत. ही वेळ घालवू नका. माँटेग्यूसाहेबांचे आभार माना असे परां- जप्यांचे म्हणणे आहे. का तर कालानुरूप त्यानी आपले काम बजावण्याचा प्रयत्न केला म्हणून. पण खरे कर्तृत्व कालाचे आहे माँटेग्यूसाहेबांचे नव्हे ही