पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/४६६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

३१ लो० टिळकांचे चरित्र भाग ६ हासाचे जर ते सूक्ष्म अवलोकन करतील तर सुधारक आणि राष्ट्रीय पक्ष यांचे है। शून्यलब्धि - समीकरण सोडविण्यास त्यास फारसे कठीण पडणार नाही. संमति कायद्यास लोकानी जो विरोध केला तो याच राष्ट्रीय तत्त्वावर होय. ज्या कायदे- कौन्सिलात लोकमताचा पूर्ण पगडा नाही त्या कौन्सिलाच्या हातात आमची सामाजिक ist आम्ही कधीहि देणार नाही. निदान रौलेट अॅक्टावरून तरी ही गोष्ट परांजपे यांच्या लक्षात यावयास पाहिजे होती. पण दुर्दैव आमचे की, तसा प्रकार अद्याप घडला नाही व पुढेहि घडेल का नाही याचा वानवाच आहे. संमति वयाच्या वेळी डॉ. भांडारकर यानी लावलेले स्मृतिवचनाचे अर्थ चुकीचे होते हे पूर्ण विचारांती आता त्यानाहि काही बाबतीत कबूल आहे. पण प्रि. परांजप्यांचे संस्कृताचे ज्ञान इतके अकटोविकट आहे की डॉ. भांडारकरांच्या चुका दाखविण्यात केसरीची अगर टिळकांची त्या वेळी चूक झाली नाही हेहि त्यांच्या काही लक्षात आले नाही. टिळकानी जेव्हा तेव्हा सुधारकास शिव्या दिल्या हीच एक त्यांची मुख्य तक्रार आहे. पण ते असे लक्षात घेत नाहीत की त्या कालात सुधारकांच्या बाजूलाहि आगरकरासारखे खंबीर लेखणीबहादर होते. ते रँग्लर नव्हते हे खरे आहे पण प्रतिपक्षावर तुटून पडून कधी उपहासानी तर कधी मर्मभेदक लेखानी विरुद्ध पक्षाचा कोटिक्रम हाणून पाडण्यात त्यांचा हातखंडा काही कमी नव्हता हे परांजपे यास माहीत असले पाहिजे. केसरीच्या गोटातून अशा प्रकारचा योद्धा सुधारणेच्या पुरस्कारासाठी जेव्हा बाहेर पडला तेव्हा केसरीवर एक मोठेच संकट ओढवले असे पुष्कळास वाटले होते. पण सत्याचे बल बाग्बलापेक्षा नेहमीच अधिक असते व त्यामुळे सुधाकरपक्षाच्या या वीराचे हल्लेहि केसरीकारास सब्याज मागे हटविता आले ते तत्कालीन 'सुधारक- केसरी'च्या वाचकास आम्ही सांगा- वयास नको. टिळकानी शिव्या दिल्याखेरीज काही केले नाही अशी रडकथा गाण्यात काय हशील ? सुधारकानीही काही कमी शिव्या दिल्या नाहीत इतकेच नव्हे तर सुधारणापक्षीयानी सरकारची आग टिळकावर पाखण्याच्या कामीहि पर्यायाने यथाशक्ति मदत केली आहे. मग ही रड कशाला ? आपल्या मदतीस आता कोणी उरले नाही म्हणून अस्पृश्य जातीतील गाजारबुणगे आपल्याकडे वळवून घेण्याकरिता तर नव्हेना ? पण आयत्या वेळी आपल्या शिपायास सोडून जाणाऱ्या अवसानघातकी पुढान्यावर या नव्या शिपायांचा तरी विश्वास कसा बसणार ! पुढारी झाले म्हणजे ' मुखरस्तत्र हन्यते ' या न्यायाने आघातहि सोसावे लागतात याचा परांजपे यास अद्याप अनुभव आलेला नाही. म्हणून टिळकांच्या पापांची यादी करून आपण त्यास सहज जिंकू आणि या कामी आपल्याला पाठबळ देण्यास गोखल्यांची पत्रे व जेध्याच्या राजवाड्यातील बाजार- बुणगे उत्सुकतेने पुढे सरसावतील अशी त्यास उमेद आहे. राष्ट्रीय पक्षाकडील बहु- जनसमाजास जनावरे किंवा बाजारबुणगे अशी संज्ञा देऊन स्वतःच मागास - लेल्या वर्गाचे बाजारबुणगे गोळा करणाऱ्या आणि त्यांचेच मत खरे राष्ट्रमत