पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/४६५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग ६ दोन अप्रिय बाद ३० राजकीय प्रगति होण्यापूर्वी सामाजिक प्रगति झाली पाहिजे आणि ती सामाजिक प्रगति या मूठभर शहाण्यांच्या सांगण्यावरून सरकारने समाजावर कायद्याने लादावी. राष्ट्रीय पक्ष म्हणजे बहुजनसमाजाचा पक्ष याच्या अगदी विरुद्ध आहे. मुसलमानी अमलातच ज्यानी स्वातंत्र्याची स्थापना केली त्यानी या सामाजिक सुधारणा प्रथम घडवून आणलेल्या नव्हत्या असा आमचा इतिहास आहे. परं- परेने प्राप्त झालेला रीतिरिवाज काही तरी मोठा प्रसंग प्रथम प्राप्त झाल्याखेरीज कोणी बदलीत नाही. हिंदुपदपाच्छाईची जेव्हा उज्ज्वल भावना महाराष्ट्रात उत्पन्न झाली तेव्हा एक ब्राह्मण संभाजीस घेऊन एका ताटात जेवला आणि रणांगणा- वर सर्व जाति एकाच पखालीतले पाणी पिऊ लागले व स्पर्शास्पर्श दोष न मानता एकाच ठिकाणी एकाच कारखान्यात शिजलेले अन्न ग्रहण करू लागले. हाच न्याय स्वीकारून हल्लीच्या गणपति उत्सवातहि विसर्जनप्रसंगी ब्राह्मणाचे व अस्पृश्य वर्गाचे गणपति एकत्र मिळून मिसळून नेण्यात येतात आणि पूर्वीच्या कालीहि काही पेशवे आपले सुत्तक दुसऱ्या एका जहागीरदारावर लादून आपण दरबारात खुशाल राजकारण पहात बसत असत हे ऐतिहासिक दाखले लक्षात आणले म्हणजे सुधारणा फुका फुकी घडत नसतात समाजास कोणती गोष्ट आपल्या उत्क- र्षाच्या आड येते हे प्रत्यक्ष कळावे लागते आणि ते कळले म्हणजे समाज आपो- आपच हे अडथळे दूर करण्यास प्रवृत्त होतो असे दिसून येईल. आमच्या सुधार- कानी प्रथमच ही गोष्ट जर लक्षात ठेवली असती तर फार बरे झाले असते. पण तसे न करता वेळी अवेळी शास्त्रकत्यांस समाजास किंवा जुन्या रीतीभातीस शिव्या दिल्याने त्यानी एका प्रकारे सुधारणेचे मागे मागेच हटविले आहे. राष्ट्रीय पक्षाचे धोरण याच्या अगदी विरुद्ध आहे. पारतंत्र्याखाली हताश झालेल्या समाजात स्वाभिमान जागृत होऊन आपल्या परंपरागत आलेल्या संस्कृतीवरच सुधारणेची इमारत उभारण्याचे जेव्हा त्यांच्या मनात भरेल तेव्हाच देशाचे वैशिष्ट्य कायम राहून हिंदुस्थान देश सुधारून जगातील पहिल्या प्रतीच्या राष्ट्राच्या योग्यतेस चढेल असे या पक्षाचे ठाम मत आहे आणि असे मत असल्यामुळे स्वाभिमान देशाभिमान धर्माभिमान मातृभाषा- भिमान आणि स्वराज्याची आवड लोकात प्रथम उत्पन्न करून मग दुसरे जे काय करावयाचे ते केले पाहिजे असे त्याने ठरविले आहे. सुधारक पक्षाला है। मत नडत असल्यामुळे स्वराज्याची आवड या शब्दांचा इंग्रजाना देशातून घाल- वून देणे असा मुद्दाम खोटाच अर्थ करून राष्ट्रीय पक्षावर सरकारचा घुस्सा होण्यास सुमार्गाने अगर कुमार्गाने या सुधारक पक्षातील लोकानी आतापर्यंत अनेकदा प्रयत्न केलेले आहेत. ना. परांजप्यास लोकांच्या डोळ्यातील कुसळ दिसते, पण आपल्या डोळ्यातील मुसळ दिसत नाहीं यास आमचा नाइलाज आहे. पण गेल्या चाळीस पन्नास वर्षांच्या महाराष्ट्राच्या किंवा हिंदुस्थानच्या इति-