पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/४६४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२९ लो० टिळकांचे चरित्र भाग ६ स्वरूपाचे आविष्करण करणे हे देशहितदृष्ट्या तेव्हाच्या वर्तमानपत्रांचे काम होते. " सोम्याची पोरगी काही तरी भुलथापीने गोम्याच्या पदरी बांधणे " ही काही खरी सुधारणा नव्हे. खऱ्या सुधारकाचे काम समाजातील बहुमत आपल्याकडे वळवून घेऊन त्याच्याकडून व स्वतः सुधारणा अमलात आणणे व आणविणे होय. पण स्वतःवर प्रसंग आल्याबरोबर कानावर हात ठेवून मोकळे होणाऱ्या परस्पर-सुधारकांच्या हातून ते कसे घडून येणार ? अशा दृष्टीने पाहिले म्हणजे रानडे काय गोखले काय किंवा खुद्द परांजपे काय सगळे एकाच माळेचे मणी होत. किंबहुना बापसे बेटा सवाई म्हटले तरी चालेल. सुधारकांच्या या धोरणात हल्लीच्या काळी थोडाबहुत फरक झालेला आहे. पण त्याचे श्रेय सुधारकास न देता त्यांच्या टीकाकारासच दिले पाहिजे. फार लांब कशाला ? पुण्यास जेव्हा स्त्री-शिक्षणासाठी इंग्रजी पद्धतीने चालविलेल्या शाळांची योजना झाली तेव्हाच या संस्था अशा पद्धतीने चालविल्यास खिस्ती मिशनऱ्यांची त्यात मोठी सोय होईल असे सुधारकास बजावण्यात आले होते. लोक व टीकाकार मूर्ख आहेत अशा समजुतीवर ठेच लागेपर्यंत त्यानी या सावधगिरीच्या सूचनेची उपेक्षा केली आणि ठेच लागल्यावरहि ते अजून पुरे सावध झाले नाहीत हे महाराष्ट्रात तरी कोणास नव्याने सांगावयास नको. प्रौढ-विवाह विधवा-विवाह स्त्रीशिक्षण वगैरे सुधारणा नकोत असे टिळकानी अगर केसरीकारानी केव्हा हि म्हटलेले नाही. पण या सर्व सुधारणा देशास हितावह अशा राष्ट्रीय पद्धतीनेच घडवून आणल्या पाहि- जेत असे टिळकाप्रमाणे बहुजनसमाजासहि त्या वेळी वाटत होते. पण परांजपे यास ते तसे कळावे किंवा कळत असले तरी सुधारकांच्याच दुर्भेद्य गोटात सांप- डल्यामुळे त्यांच्या डोळ्यापुढे ते कसे उभे राहावे ? स्मृतिनाशच नव्हे तर खोटे- पणा देखील क्रोधाने कसा उत्पन्न होतो याचे एक उत्कृष्ट उदाहरण त्यांच्या लेखात आलेले आहे. १८९५ साली सामाजिक परिषद राष्ट्रीय सभेच्या मंडपात भरू नये असा बहुमताला अनुसरून टिळकांचा आग्रह होता. या वेळी टिळ- कानी "सभामंडप जाळला" असे प्रथम जेधेमन्शनच्या आपल्या ढोलकेवाल्यांच्या सभेत विधान करून पुढे आपल्या पत्रात टिळकानी सभामंडप जाळण्याची भीति घातली असे त्यानी विधान केले आहे. वस्तुतः ही दोनहि विधाने खोटी होत. यापैकी दुसरे म्हणजे भीतीचे विधान सहज बोलता बोलता गमतीखातर कै. श्रीधर विठ्ठल दाते यानी केले होते. आणि ह्यामुळे सुधारकांचे शेंदाडशिपाई घाबरून जाऊन आप- णास कसे उपहासास्पद करून घेतात एवढीच गंमत दाते यास पहावयाची होती. परांजपे यास ही गोष्ट माहीत आहे काय ? असल्यास असला विपर्यास त्यानी का करावा ? सुरतेच्या बखेड्याबद्दल बोलतानाहि त्यानी अशाच प्रकारच्या त्यांच्या गोटात चालू असलेल्या निवळ गप्पांच्या आधारे सत्यापलाप केलेला आहे. सुधारक पक्षाचे धोरण पहिल्यापासूनच असे आहे की सामान्य जनसमूहाला शिव्या द्याव्या आणि सरकारशी प्रसंग आला म्हणजे नमते घ्यावे. त्यांच्या मते