पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/४६३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग ६ दोन अप्रिय वांद २८ फर्ग्युसन कॉलेजचे परांजपे हे प्रिन्सिपाल आहेत त्याची स्थापना सुधारक पक्षाने केलेली नव्हे, राष्ट्रीय पक्षाचे पुरस्कर्ते टिळक-चिपळूणकर यानीच केलेली आहे ही गोष्ट क्रोधाच्या भरात स्मृतिनाश झाल्यामुळे परांजपे यास आठवली नाही. इतकेच नव्हे तर लोकांचे शिक्षण लोकांच्या ताब्यात पाहिजे अशा हेतूने ज्या राष्ट्रीय शिक्षणसंस्था पुणे शहरात राष्ट्रीय पक्षाच्या पुरस्कर्त्याकडून स्थापन झाल्या त्या निमसरकारी बनवून त्यांच्या मूळ हेतूवर बिब्बा घालण्याचे महत्कृत्य मात्र गोखले आदिकरून परांजपे यांच्या गुरूंच्या व आद्यगुरूंच्या हातून घडले हेहि आयत्या बिळावर नागोबा या न्यायाने सदर संस्थांचे आधिपत्य स्वीकारणाऱ्या प्रिन्सि- पालांच्या ध्यानात आले नाही. पण टिळकास या कामी आपल्या आयुष्याची पहिली उमेदीची अकरा वर्षे खर्च करावी लागली आणि पुढे मूळ हेतु तडीस जाणे जेव्हा अशक्य झाले तेव्हा सदर संस्थाशी आपला संबंध तोडून टाकावा लागला ही गोष्ट पुण्यातच काय तर महाराष्ट्रातहि विश्रुत आहे. डेक्कन एज्यु- केशन सोसायटीनंतर टिळकानी 'केसरी' पत्र हाती घेतले व तेव्हापासून केसरी- कार या नात्याने राष्ट्रीय मतांचा देशात प्रसार करण्यास त्यांच्या हातून सुरुवात झाली. हे काम त्यानी कसे बजावले हे गणिताच्या गुहेत पडलेल्या प्रि. परांजप्यास जरी दिसले नाही तरी सर्व महाराष्ट्रात ते महशूर आहे. त्या काली व तत्पूर्वी सुधारणावाल्यांचा पक्ष आपल्याला मोठा प्रबल मानीत असे. आणि त्यांचे रथी व महारथी बहुतेक सरकारी अमलदार किंवा पेन्शनर असल्यामुळे धन्याकडे पाठ करून गरीब बिचाऱ्या समाजावर यथेच्छ तोंडसुख घेऊन आपली प्रौढी मिर- विण्याची त्यास मोडी संधि मिळालेली होती. एखाद्या गरिबाची पोर कोणत्याहि प्रकारे पकडून आणून तिचा कोणत्या तरी मनुष्याशी कसा तरी पुनर्विवाह लावून दिला म्हणजे आपण कृतार्थ झालो किंवा एक मोठे शतकृत्य केले असे या सुंधा- रकास तेव्हा वाटत असे. आणि इंग्रजी आचार इंग्रजी विचार इंग्रजी खाणेपिणे किंबहुना इंग्रजी रीतीने देवाची प्रार्थना करणे यातच काय तो पुरुषार्थं आहे आपले जुने आचार किंवा शास्त्र सर्व कुचकामाचे होत असे या सुधारक पंडितांचे त्यावेळी नित्य प्रतिपादन चालत असे. मात्र या सुधारणा स्वतःच्या आचरणाने अमलात आणण्याचा जेव्हा परमेश्वरकृपेने प्रसंग येई तेव्हा कोणी आईची तर कोणी बापाची अगर बहिणीची सबब सांगून मोठ्या युक्तीने ते आपल्या भित्रे- पणावर पांघरूण घालण्याचा प्रयत्न करीत असत. ना. परांजपे यास या गोष्टी कदा- चित अवगत नसतील किंवा असल्यास जळफळाटाच्या भरात त्या ते विसरून गेले असतील. कसेहि असो. आम्ही परांजपे यास निक्षून असे बजावतो की त्यास ज्या सुधारक पक्षाचा अभिमान आहे त्या पक्षाची सुधारणा घडवून आण- ण्याची तत्कालीन पद्धत इतकी गी होती की त्यामुळे त्यांचे वर्तन उपहासास्पद होई इतकेच नव्हे तर खऱ्या सुधारणा समाजात लवकर रूढ होण्यासहि त्यामुळे पुष्कळ अडथळा झालेला आहे. सुधारक पक्षाच्या तत्कालीन वर्तनाच्या खऱ्या