पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/४६२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२७ लो० टिळकांचे चरित्र भाग ६ करून बहुत परिश्रमाने टिळकांच्या पापांची एक अशी यादी तयार केली की त्याखाली विचारे टिळक आणि त्यांचे अनुयायी एकदम चीत होऊन जावे. पण क्रोधाने जळफळत लिहिलेल्या अशा प्रकारच्या लेखाने लेखक आपला अविचा- रीपणा आणि सारासारशून्यता मात्र व्यक्त करून आपले हसे करून घेत असतो हे ना. परांजपे यांचे लक्षात आलेले दिसत नाही. आमच्यात अशी एक म्हण आहे की कावळ्याच्या शापाने गाय मरत नसते व तीच स्थिति परांजपे यांच्या लेखाची आहे. टिळकांच्या पापांची केवढी मोठी जंत्री जरी परांजप्यानी प्रसिद्ध केली तरी त्यामुळे टिळकांबद्दल असलेली लोकांची आदरबुद्धि कमी होणे शक्य नाही व अशा दृष्टीने पाहिले तर परांजप्यानी टिळकावर केलेल्या आरोपास सवि- स्तर उत्तर देण्याचीहि जरूर नव्हती. शिवाय टिळकानी व इतर गृहस्थानी योग्य उत्तरे त्यास दिलीहि आहेत. म्हणून त्यातील जेवढे मुद्दे सार्वजनिक आहेत तेव- त्यांचाच विचार आज या लेखामध्ये आम्ही करणार आहो व तोहि टिळकांचा केसरीशी जो संबंध होता तो लक्षात ठेवून करावयाचा आहे. कारण टिळकांच्या पूर्वेतिहासात केसरीचाहि इतिहास अंतर्भूत झालेला आहे. परांजपे यांचा टिळका- वर पहिला मोठा दोषारोप हा की पुणे शहरातील लोकानी त्याना मानपत्र देण्यासारखे त्यानी काय केले ? विधवांचे विवाह लावले नाहीत अस्पृश्य वर्गातील लोकावरो- बर एका ताटात जेवले नाहीत किंवा अभक्ष्यभक्षणहि केले नाही अथवा आपल्या जुन्या धर्माचा इतिहासाचा अगर परंपरेचा अभिमान सोडून उदार तर्काने प्राप्त झालेल्या दुसन्या सुधारणाहि समाजावर सरकारच्या मदतीने लादण्याचा उद्योग केला नाही इतकेच नव्हे तर अशा प्रकारच्या सुधारणास शक्य तेवढा प्रतिरो- धच केला. मग यास मानपत्र कशाला ? यावर परांजपे यास पहिल्याने आमचे असे विचारणे आहे की टिळकाना जे मानपत्र देण्यात आले ते वरील कारणा- करिता होय असे तुम्हाला कोणी सांगितले ? परांजपे कैंब्रिजहून येथे परत आल्या- वर त्यांचा जो लोकानी सन्मान केला त्यावर जर कोणी असे आक्षेप घेतले असते की गणितशास्त्राची त्यानी काथ्याकूट केली त्यात त्यानी देशहित काय केले यांपेक्षा चामडे कमावण्याचा किंवा घरसफाईचा जर ते धंदा शिकून आले असते तर बरे झाले असते, कारण अस्पृश्य वर्गाची उन्नति मग त्यांच्या हातून चांगली झाली असती आणि आमच्या घरातील स्वच्छता ठेवण्यासहि मग बरे पडले असते तर ते आक्षेप खुद्द परांजपे यास कितीसे पटले असते ? कोणी कोणाला जो मान देतो तो त्याने न केलेल्या गोष्टीबद्दल नव्हे तर केलेल्या गोष्टीबद्दल असतो हे रागाच्या व चिरडीच्या सपाट्यात प्रि. परांजपे यांच्या लक्षात राहिले नाही. टिळकाना जे मानपत्र देण्यात आले त्यात टिळकानी जी कामगिरी केली तिचा स्पष्ट उल्लेख आलेला होता, आणि ती कामगिरी खरी नाही असे जोपर्यंत दाख- विता येत नाही तोपर्यंत टिळकानी परस्पर-सुधारकाप्रमाणे विधवांची लगे लाविली नाहीत म्हणून हे मानपत्र योग्य नव्हे हा कोटिक्रम अत्यंत मूर्खपणाचा होय. ज्या