पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/४६१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग ६ दोन अप्रियवाद (९) दोन अप्रिय वाद २६ डिसेंबर १९१९ व मार्च १९२० या महिन्यात टिळकाना दोन अप्रिय वादात पडावे लागले. एक रँगलर परांजप्याशी व दुसरा बेझंटवाईच्या अनुयायाशी. परांजपे यानी मुंबईच्या दैनिक पत्रातून टिळकांची मनसोक्त निंदा करून आपल्या- कडून पुण्याच्या मानपत्र प्रसंगी विरोध करण्यात आलेल्या अपयशाचा वचपा काढण्याचा प्रयत्न केला होता. त्याला टिळकाना उत्तर द्यावे लागले व ते त्यानी इंग्रजी पत्रातून व केसरीतूनहि दिले. दुसन्या वादात बेझंटबाईनी विलायतेत केलेली वर्तणूक आणि खापर्डे पटेल यानी बाईवर केलेली टीका हा विषय असून अकोलेकर वासुदेवराव चिपळूणकर वगैरे मंडळीनी मुंबईच्या एका मराठी दैनिक पत्रात टिळकावर टीकापर असे अनेक लेख लिहिले होते. टिळकाना त्यानाहि उत्तर द्यावे लागले. ही दोनहि उत्तरे केसरीत प्रसिद्ध झाली होती. पृष्ठ २४ वर रँगलर परांजपे यास टिळकानी दिलेले उत्तर परिशिष्टात दिले आहे असे सांगितले आहे. तथापि टिळकानी प्रि. परांजपे याना दिलेले उत्तर व बेझंटबाईस दिलेले उत्तर ही एका ठिकाणीच देणे इष्ट वाटल्यावरून त्यातला महत्त्वाचा भाग याखाली दिला आहे. ना. परांजप्यांचा जळफळाट क्रोधाद्भवति संमोहः संमोहात्स्मृतिविभ्रमः । स्मृतिभ्रंशाद्बुद्धिनाशो बुद्धिनाशात्मणश्यति || मनुष्य एकदा क्रोधवश झाला म्हणजे तो काय करील व काय न करील याचा नेमच रहात नाही. तशी गत फर्ग्युसन कॉलेजचे मि. परांजपे यांची आता झाली आहे. पुणे नागरिकांच्या तर्फे टिळक-केळकरास दिलेल्या मानपत्रास विरोध करण्याचा त्यानी कसा प्रयत्न केला आणि चोवीस तासांची नोटीस मिळाली असताहि सभेत तोंड दाखविण्याचे धैर्य न झाल्यामुळे त्यांचा तो प्रयत्न कसा- फसला गेला याची हकीकत आम्ही गेल्या अंकी दिलीच आहे. पण प्रि. परांज- प्यासारख्या केंब्रिजमध्ये रँग्लरच्या परीक्षेत पास झालेल्या गृहस्थास ही फजिती व हा अपमान कसा सहन होणार ! पुण्यातील सामान्य लोकसमूह अविद्वान् मूर्ख आणि टिळकांच्या नादी लागणारा असल्यामुळे त्यांच्यापुढे आपल्या विद्वत्तेचे प्रदर्शन करण्यास परांजपे आले नाहीत खरे, पण त्यांची लिहिण्यावाचण्याची खोली काही अशा प्रकारच्या जनावरानी भरलेली नव्हती. तीत अनेक गणित्यांची व शहाण्यांची परांजपे पुस्तकरूपाने नित्य भेट घेत असतात. म्हणून तेथूनच आपले अगाध ज्ञान ज्यात प्रगट झाले आहे असे एक लांबलचक पत्र मुंबईच्या 'क्रॉनिकल' पत्रास पाठवून त्याने टिळकांचा पराभव करण्याची अजब युक्ति त्यानी शोधून काढली व टिळकांच्या आयुष्याच्या एकंदर इतिहासाचे अवलोकन टि० उ... ३३