पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/४६०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२५ लो० टिळकांचे चरित्र ब्राह्मणेतरांचे मानपत्र भाग ६ "अत्यंत पूज्य देशभक्त – मद्रास में. असोसिएशन ही जरी येथील सर्व संस्थात वयाच्या मानाने सर्वात लहान आहे तरी ती या इलाख्यातील असंख्य ब्राह्मणेतरांची प्रतिनिधि आहे. सुधारणा-बिलासंबंधाने आपण विलायतेत जी कामगिरी केली व आपल्या मातृभूमीच्या कार्याविषयी आपण जे अदम्य धैर्य व अखंड कळकळ दाखविली तिच्याविषयी इतर संस्थाप्रमाणेच आम्हासहि अंत:- करणपूर्वक आदर व कौतुक वाटत आहे. वृद्धापकाळ आणि आपल्याविषयी विलायतेत पसरलेले दुष्ट दुर्ग्रह या अडचणीतूतहि आपण अतिशय कुशलतेने मार्ग काढून नुसत्या मजूरपक्षासच नव्हे तर लिबरल पक्षाच्या अनुयायांसहि हिंदी लोकांची मागणी न्याय्य असल्याचे कबूल करावयास लाविले. मातृभूमीला गुलाम- गिरीतून मुक्त करण्याकरिता ज्या देशभक्तानी श्रम केले व कष्ट सोसले त्या सर्वात कोणासहि आपल्यावर नंबर देता येत नाही हेच आजचे मत पुढील पिढ्यासहि मान्य होईल. या भूमीच्या उद्धारार्थ अद्यापिहि पुष्कळच पवित्र कर्तव्ये करावयाची जरूरी आहे. अशा वेळी येथे जातीजातीत मत्सर वाढावा आणि पक्षभेद प्रबळ होत जाऊन ते राजकीय मोक्षाच्या मार्गात आडवे यावे हे अत्यंत शोचनीय आहे. पण आपण आपल्या नैसर्गिक उदारशीलतेने व समंजसपणाने हे सगळे भेदभाव मोडून टाकून सर्वांची एकवाक्यता करण्याची मुत्सद्दीगिरी दर्शवाल अशी आमची खाली आहे. पंजाबावर कोसळलेल्या अनर्थाचे केंद्रस्थान जे अमृतसर तेथे इति- हासप्रसिद्ध होणारी यंदाची काँग्रेस भरण्यापूर्वीच सुधारणा- बिल पास होऊन जाईल. तेव्हा पुढे आम्ही धोरण कोणते स्वीकारावे याविषयी आपणच उत्तम दिग्दर्शन कराल. राष्ट्रातील भिन्नभिन्न मतौघांचा विरोध मोडून त्या सर्वांना इष्ट वळण लावून त्यांच्यात ऐक्यशक्ति निर्माण करण्याचे कार्य आपणच करू शकाल. हिंदभूमीला मार्ग दर्शविणारा व तिचे रक्षण करणारा दयाळू भगवान आपणाला सामर्थ्य व उमेद देवो आणि त्या योगेकरून ब्रिटिश छत्राखाली हिंदुस्थानाला आपल्या परिश्रमाने प्राप्त होणारे स्वराज्यरूपी फळ चाखावयास मिळो एवढीच आमची प्रार्थना आहे. " या सर्व मानपत्राना मिळून टिळकानी एकच उत्तर दिले. त्यात विलायते- तील हकीगत सांगितल्या व तेथेहि टिळकानी असे स्पष्ट सांगितले की " हल्लीच्या बिलाचा फायदा घेऊन त्याच्याच अनुरोधाने आम्हाला पुढील चळवळीची दिशा आखली पाहिजे, ” ता. १८ रोजी टिळकाना मजूरसंघाने आपले स्वतंत्र मानपत्र दिले. त्यालाहि टिळकानी समयोचित उत्तर दिले. याशिवाय लॉ कॉलेजातील विद्यार्थ्यांपुढे 'इंडियन नॅशनॅलिटी' या विषयावर टिळकांचे व्याख्यान झाले. मद्रा- सच्या व्यापारी मंडळीनीहि वेगळी पानसुपारी करून स्वराज्यसंघाला तीन हजा- रांची रक्कम दिली. शेवटी पुनः मोठी मिरवणूक काढून मद्रासच्या नागरिकानी त्याना स्टेशनावर परत पोहोचविले.