पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/४५९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग ६ मद्रासची सफर २४ रुपयाच्या करंड्यात घालून मानपत्र टिळकाना अर्पण करण्यात आले. टिळकानी उत्तर देताना जो होणार होता त्या विरोधाचा उल्लेख करून म्हटले की हा विरोधाभास झाला नसता तर समारंभ आळणी झाला असता. पण विलायती मीठ मात्र समक्ष येऊन आमच्या खिरीत पडले नाही. त्याची मी वाट पाहात होतो. पण विरोध करणारे पुढारी कोठे आहेत ? आणि एवढ्या जबाबदारीचे काम या एकट्या लहान अप्रसिद्ध मुलावर त्यानी का सोपविले? अमक्याने अमुक कार्य केले नाही असा आक्षेप घेणे चुकीचे आहे. कारण एकटी व्यक्ती सर्वच कामे करू शकत नाही. प्रत्यक्ष परमेश्वरासहि निरनिराळी कामे करण्याला निरनिराळ्या देवतांची योजना करावी लागते. नंतर त्यानी सुधारणाना उद्देशून “जे काही मिळेल ते तर घ्याच पण पुनः बाकीचे राहिलेले मिळविण्याविषयी निश्चयाने झटा. आपसातील फाटा- फूट आज योग्य नाही. एकी असल्याशिवाय ज्यांच्या हाती स्वराज्य आहे त्यांची मूठ आपणाला उघडणार नाही" असे सांगितले. टिळकानी मूळ रेमार्केटमधील सभातूनच आपल्या सार्वजनिक चरित्रात प्रवेश केला असे काहीचे म्हणणे आहे. ते कसे हि असो. पण ते या जागेतल्या सभेला हजर राहिले अशी ही बहुधा शेवटचीच सभा होय व तिच्याइतकी दुसरी कोणतीच सभा या ठिकाणी साजली नाही व गाजलीहि नाही. प्रि. परांजपे यानी सभेला येण्याचे टाळले पण त्यानी क्रॉनिकलला एक लांबलचक पत्र पाठवून आपला विरोध व्यक्त केला व त्यात टिळकांची जितकी पापे म्हणून त्याना आठविली तितकी क्रमवार लिहिली. त्याला टिळकानी क्रॉनि- कलमध्येच उत्तर दिले. शिवाय अग्रलेखाच्या रूपाने १६ डिसेंबरच्या केसरीतहि त्यानी उत्तर दिले आहे. पुण्याच्या या सत्कार समारंभासंबंधाने त्याना दिलेले मान पत्र आणि रॅ. परांजप्याना केसरीतून त्यानी दिलेले उत्तर ही दोन्ही मुद्दाम परिशि- टात दिली आहेत म्हणून त्यातील मजकूर आम्ही आपल्या शब्दानी देत बसत नाही. (८) मद्रासची सफर टिळक अमृतसरच्या राष्ट्रीय सभेला जाणारच होते. पण त्यापूर्वी मद्रास येथे त्याना निमंत्रण आल्यावरून ता. १७ रोजी ते मद्रासेस पोहोचले. स्टेशनवर मद्रासचे बहुतेक सर्व पुढारी व मजूरसंघाचे प्रतिनिधी हजर होते. त्यानी टिळ- काना मिरवणूक काढून सुब्बाराव कामत यांच्या बंगाल्यावर पोहोचविले. सायं- काळी प्रेसिडेन्सी कॉलेजच्या समोर समुद्रतीरावर 'हिंदू'चे संपादक कस्तुरीरंग अय्यं- गार यांचे अध्यक्षतेखाली जाहीरसभा भरली. तीत अनेक संस्थातर्फे मानपत्रे देऊन सत्कार करण्यात आला. त्यात ब्राह्मणेतर संघाने दिलेले मानपत्र अर्थात विशेष महत्त्वाचे होते म्हणून ते यापुढे मुद्दाम दिले आहे. पुण्यास ब्राह्मणेतरांच्या नावाने टिळकाना जो थोडासा विरोध झाला त्याला मद्रासच्या या संघटित • ब्राह्मणेतर समाजाने दिलेले मानपत्र हे चोख उत्तर होते. ते मानपत्र असे:-