पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/४५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

३४ लो० टिळकांचे चरित्र भाग १ असत आणि त्याबद्दल गोखल्याना ते बहुमानहि देत. टिळक हे गोखल्यांच्यापेक्षा वडील असले तरी मेथांपेक्षा बारावर्षांनी लहान यामुळे त्यानाहि मेथा हे तरुण- पिढीच्या माणसाप्रमाणे वागवीत. मेथांचे व टिळकांचे केव्हाहि फारसे बनले नाही याचे कारण त्या उभयतांचा संबंध म्हणजे लोखंड गारगोटीच्या संयोगासारखा असे. दोघेहि टणक मानी हट्टी. तथापि प्रतिपक्षातील झाले तरी टिळकांची योग्यता ते जाणून होते. राष्ट्रीय सभेत ते हळूहळू मागे पडण्याचे खरे कारण असे की टिळकांचीच काय पण गोखल्यांचीहि झडप पुढे पुढे त्याना झेपेनाशी झाली. वर्षातून एकवेळ जमून राजकारणाचा आढावा घ्यावा समालोचन करावे हीं त्यांची राष्ट्रीय सभेची कल्पना गोखले यानाहि मान्य नव्हती. तसेच गोखले यानी राजकारणाचा मार्ग म्हणून घालून दिलेले स्वार्थत्यागाचे उदाहरण त्यांच्या बुद्धीला पटत नसे. पण तात्विक राजकीय मतांपेक्षाहि सामान्य लोकाना मेथा अप्रिय होण्याचे खरे कारण म्हटले म्हणजे सामान्य जनतेपासून नेहमी तुटक व अलिप्त राहणे हा त्यांचा अवगुण होय. आधी मुंबई शहरात बारमास वस्ती. सुट्टी मिळाली की थंड हवेत राहण्यास नित्य जात. यामुळे त्याना भेटणे हे देखील सामान्य मनुष्याला मोठे मुष्किलींचे होई. आणि त्यातूनहि त्यांचा दरारा विशेष यामुळे त्यांची भेट घेणे म्हणजे आधी डोंगर तुडवीत जावा आणि शेवटी वाघाची गाट पडावी असे होई! आपल्या वकिलीच्या खोलीत रोज तासभर संध्याकाळी बसून त्या वेळात आपली हस्तक मंडळी बरोबर घेऊन त्याना सल्लामसलत द्यावी त्याना कामाला पिटाळावे व आपल्या आज्ञा त्यांच्या उद्योगाने अंमलात आणाव्या याशिवाय अधिक घासाघीस त्याना सोसत नसे, पण अशा रीतीने राजकारण व्हावे तसे सिद्ध होत नाही. पुढे पुढे तर त्यानी राष्ट्रीय सभेला जाण्याचेच टाकून दिले आणि एखाद्या चिकट प्रसंगी हजर राहण्याविषयी गळ घालून जेव्हा त्यांची आराधना करावी तेव्हा ते हजर राहावयाचे. त्यांची व्यवस्था ठेवणे हा कोठल्याहि स्वागतमंडळाला एक मोठा पेचच असे. पण पुढारी होण्याला जी बुद्धिमत्ता लागते ती असून शिवाय जे काही बाह्यस्वरूपाचे गुण लागतात तेहि त्यांच्या ठिकाणी होते. पाहताच रुबाबदार दिस- णारा मनुष्य त्यांच्यासारखा हजार पाचशेतहि मिळणार नाही. एकाच राजकीय मताचे असताहि गोखले हे जितके सौम्य वाटत तितकेच मेथा हे उग्र वाटत. त्यांची उंची, विशाल भालप्रदेश, उन्नत नासिका, भरदार मिशा, ऐटदार कल्ले उंची पोषाखाची ढब उठण्याबसण्याबोलण्यातला ताठरपणा भाषेतील जोर ठासून बोलण्याची ऐट आणि या सर्वांना शोभणारा एखाद्या खोल दरीतून झालेल्या भुभुःकारासारखा आवाज या सर्वोची छाप स्वकीय परकीय कोणावरहि पडे. थोड- क्यात थट्टा करून प्रतिपक्षाला पातळ करून टाकण्याची विद्याहि त्यांच्याजवळ असे. येवढेच काय पण प्रसंगविशेषी मिस्किलपणाने कोणाकडे डोळे मिचकावून कोणाला शाबासकीने मोठेपणा देऊन कोणाला तात्पुरती ममता दाखवून जवळ बोलावून अशा रीतीनेहि ते आपले कार्य साधीत. त्याना पाहणाऱ्या प्रत्येकाला हा