पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/४५८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२३ लो० टिळकांचे चरित्र भाग ६ विरुद्ध असतील, पण असल्या गोष्टीना कोणत्याहि शहरातील एकून एक लोकांची संमति असणे शक्यच नाही. शहरातील बहुजनसमाजाला एखादी गोष्ट मान्य असली म्हणजे ती शहराला मान्य आहे असेच म्हणतात. पण आपली समजूत या कामी वेगळी असल्यास बहुजनसमाजाची तशी खात्री करून देण्याकरिता तुम्ही सभेला या. तुमच्याकरिता जागा ठेवू आणि विरोध करण्याला कायदेशीर सनद- शीर संधी देऊ. उगीच बखेडा न व्हावा म्हणून जागा तुमच्यासाठी वेगळी राखून ठेवू. तरी किती लोक बसण्याची सोय पाहिजे ते आगाऊ कळवावे. " पण ही व्यवस्था स्वीकारण्यास परांजपे वगैरे पुढारी तयार नसल्याने त्यानी ता. ७ च्या 'ज्ञानप्रकाशा'त असे प्रसिद्ध केले की “ मानपत्र हे स्नेही व चाहते लोक यांच्या- तर्फेचेच आहे अशी आमची समजूत झाल्यामुळे आम्ही आपल्या अनुयायाना सभेला कोणीहि हजर न राहण्याविषयी सूचना दिली आहे. " पण त्यांची तशी समजूत व्हावी असे खरोखर कोठेच काहीहि घडलेले नव्हते. पण 'आमची तशी समजूत झाली' असे लिहून सभेला हजर राहण्याचा अवघड प्रसंग त्यानी टाळला इतकाच त्याचा अर्थ. कारण उघडच आहे की विरोध करणारे लोक आधी फारच थोडे व होते त्यातूनहि सभेला येऊन विरोध करण्याचे धैर्य फारच थोड्याना होते. तेव्हा खोट्या समजुतीची बतावणी पुढे करून विरोधकानी पाऊल मागे घेतले इतकेच. दुसरे काय? पण त्यांची ही भोळी व सोयीची समजूत टिकू देऊ नये व विरोध करावयाचा असेल तर या असे उघड आव्हान द्यावे म्हणून स्वागतमंड- ळाने त्याना पुनः लिहून कळविले की "आम्ही तुम्हाला फिरून सांगतो की मान- पत्र सर्व नागरिकांतर्फे म्हणून आहे. तुमची समजूत चुकीची आहे. तुम्ही आम च्याकडे ठराव पाठविला नसता आणि सभेला आला नसता तर मग काहीच हरकत नाही. बसल्या जागी कोणी काय वाटेल ते समजावे. पण ठराव आमच्याकडे पाठविला तुमच्या बसण्याची आम्ही व्यवस्था केली आणि आता जर तुम्ही सभेला न याल तर तुम्ही आपला विरोध परत घेतला असे आम्ही समजू." हे उत्तर सभेच्या वेळेपूर्वी चांगले सहा तास परांजपे यांजकडे पाठविण्याची खबरदारी घेतली होती. परंतु या राखून ठेवलेल्या जागेत कोणाचीच भरती झाली नाही. इतर समाज मात्र त्या विस्तीर्ण पटांगणात न मावे इतका मोठा होता. सभेचे अध्यक्षस्थान लक्ष्मणराव आपटे वकील याना दिले होते. त्यानी लहानसे भाषण करून अभिनंदन व स्वागतपर संदेश वाचून दाखविले. मुख्य मानपत्र लक्ष्मण- राव भोपटकर वकील यानी वाचून दाखविले व त्यावर इतर काही भाषणे झाल्या- वर अध्यक्षानी सहजच विचारले की कोणास उलट बोलावयाचे असल्यास मी संधी देतो. तेव्हा एक ब्राह्मणेतर मुलगा पुढे आला आणि म्हणाला " आणखी काही दिवसानी आम्ही अस्पृश्य वर्गाचे सहभोजन करणार आहो त्याला टिळक येतील तर मग माझा मानपत्राला विरोध नाही !” याशिवाय दुसरा कोणी वक्ता पुढे आला नाही. शेवटी मते घेता 'एकविरुद्ध सर्व' असे अध्यक्षानी जाहीर केले आणि सुंदर