पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/४५७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग ६ पुण्याचा स्वागतसमारंभ २२ या मानपत्रासंबंधाने सांगण्याची एकच गोष्ट महत्वाची ती अशी की पुणे म्युनिसिपालिटीने सरकारी अधिकारी नाही अशा गृहस्थाला मानपत्र दिले असे हे पहिलेच. आजपर्यंत मानपत्रे देण्यात येत असत पण ती प्रायः गव्हर्नर वगैरेनाच, म्युनिसिपल कायद्यात अशा मानपत्राना खर्च करण्याचा अधिकार म्युनिसिपालिटीस दिलेला नव्हता. आणि खर्च स्वतंत्र रीतीने केला तर मानपत्र देण्याला कायदा आडवा येत नाही असा श्लेष त्यातून निघण्याजोगा होता. अर्थात् तो श्लेष हुडकून काढून खर्च खाजगी उभारून मानपत्र म्युनिसिपालिटीने द्याव याचे अशी शक्कल निघण्यालाहि टिळकाना मानपत्र देण्याची उत्सुकताच मूळ कारणीभूत झाली. पुण्यात म्युनिसिपालिटीतर्फे पहिला पुतळा होऊन उभारण्याचा मान जसा टिळकाना मिळाला तसाच पहिले मानपत्र देण्याचा मानहि टिळका- नाच मिळाला. यानंतर पुढे अनेक लोकाना मानपत्रे देण्यात आली व काही खाजगी खर्चाने तर काही म्युनिसिपालिटीच्या खर्चाने देण्यात आली. त्यात कोणाचा खर्च सरकारने मंजूर केला कोणाचा नामंजूर केला कोणाचा कोर्टात फिर्यादी करून बसूल केला असे अनेक प्रकार झाले. आणि या प्रकारामुळे म्युनिसिपल अॅक्टाची मुद्दाम दुरुस्ती करण्यात येऊन अमुक इतक्या बहुमताने म्युनिसिपालिटीने ठराव केला म्हणजे मानपत्र देता येते इतकेच काय पण त्यावर वाटेल तो खर्चहि करता येतो असा सर्रास कायदा झाला. पण सांगण्याचे तात्पर्य इतकेच की या नव्या विचाराला व आचाराला म्हणजे या क्रान्तीला टिळकांच्या मानपत्रापासून सुरवात झाली. पुतळ्याच्या खर्चासंबंधानेहि पुढे सरकारने म्यु. वर फिर्याद केली होती तीत सरकारचाच पराभव झाला ही गोष्ट जाता जाता येथे सांगितली पाहिजे. जाहीर सन्मान व विरोध हे स्वागतसमारंभ तर उरकलेच. पण शहर नागरिकातर्फे जे मानपत्र द्याव- याचे ठरले होते त्यासंबंधात टिळकांच्या प्रतिपक्षीयानी विरोध करण्याचा विचार केला. त्यांचे म्हणणे असे की टिळकाना मानपत्र द्यावयाचे तर त्यांचे मित्र भक्त व चाहाते यानी आपल्यापुरते द्यावे पण सर्व शहरच्या नागरिकांचे नाव त्यात का घालावे ? आम्हाला हे मानपत्र मंजूर नाही म्हणून आम्हाला समक्ष तेथे येऊन विरोध करावा लागेल. पण असे करण्यापेक्षा सर्व नागरिकातर्फे हे शब्द त्यातून काढून टाकले तर मग आमचे काहीच म्हणणे नाही. या प्रतिपक्षीयात शहरातील नेमस्त व ब्राह्मणेतर चळवळीचे पुढारी असे दोन वर्ग होते. ता. ४ डि० रोजी रात्रौ जेधे मॅन्शनमध्ये विरोधी मंडळीची सभा होऊन मानपत्राच्या सभेत विरोध कर- ण्याचा ठराव त्यानी मंजूर केला व त्याची एक प्रत प्रि० परांजपे व गुते वकील यांच्या सहीने स्वागतमंडळाकडे पाठविण्यात आली. त्याना उलट स्वागतमंडळाकडून असे लिहिण्यात आले की "मानपत्र सर्व नागरिकातर्फे आहे ही गोष्ट खरी आहे. त्याचा उपक्रम म्यु०ने यापूर्वीच केला आहे. तुमच्यासारखे काही लोक या गोष्टीला