पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/४५६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

लो० टिळकांचे चरित्र पुणे शहर म्युनिसिपालिटीतर्फे सम्मान भाग ६ पुणे येथील म्युनिसिपालिटीने ता. १ डिसेंबर रोजी टिळकाना जे मानपत्र दिले त्याचा सारांश पुढे दिल्याप्रमाणे आहे- इतिहास प्रख्यात "राजकीय औद्योगिक शैक्षणिक व सामाजिक चळवळीचे केंद्रस्थान आणि गेली चाळीस ४० वर्षे आपले वसतिस्थान अशा या प्राचीन व शहराला आपण विलायतेहून सुखरूपपणे परत आला या प्रसंगी आम्ही आपले मनःपूर्वक स्वागत करितो. पुणे शहर हे महाराष्ट्राला ललामभूत असे शहर असून ज्यांच्या परिश्रमाने या पुण्यपत्तनाला हे उच्च स्थान मिळाले त्यात आपली गणना असल्याने आपणास हे मानपत्र देणे आम्ही आपले कर्तव्यच समजतो. आपण दोन वर्षे या कमिटीचे सभासद होता. व त्यावेळी आपण जी कामगिरी केली तिचे चीज यापूर्वीच व्हावयास पाहिजे होते. "आपल्या आयुष्याचा पूर्वभाग वृत्तपत्रीय व शिक्षणविषयक चळवळीत गेला. त्यावेळी संस्थापित झालेल्या डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या द्वारे आपण व आपले सहकारी यानी नव्या पिढीला स्वार्थत्यागाचा घडा घालून दिला. स्वार्थत्यागाविना कोणताही देश ऊर्जित दशेस येत नाही, या आपल्या स्वार्थ- त्यागाच्या उदाहरणाने महाराष्ट्राचे लक्ष सरकारी नोकरी हेच ध्येय न मानता, उद्योगधंद्याची वाढ खासगी कारखाने आणि सर्व चळवळीत पाश्चात्य राष्ट्राशी चढाओढ याकडे वळले. आपण वाङ्मय तत्वज्ञान व प्राचीन संशोधन या विषयात जे महत्कार्य केले त्यांचा प्रामुख्येकरून उल्लेख करणे जरूर आहे. आपले 'ओरायन' व 'आक्टिक होम' या दोन ग्रंथांची प्रख्यात पंडिताकडून जगभर वाखाणणी झाली. गीतारहस्य हा ग्रंथ केवळ टीकारूप नसून त्यात नावीन्य आहे आणि नीतितत्त्वाची फोड फारच विशदपणे केलेली आहे. "गेली तीस वर्षे आपण जी राजकीय चळवळ चालविली आहे तिचे ध्येय ब्रिटिश छत्राखाली वसाहतीच्या पद्धतीचे स्वराज्य हिंदुस्थानास मिळावे हेच असून त्या ध्येयाकरिता आपण जे अविरत श्रम करीत आहा त्याबद्दल सर्व हिंदुस्थान व विशेषतः महाराष्ट्र आपला अत्यंत ऋणी आहे. ब्रिटिश जनतेचे मन हिंदीराष्ट्राला अनुकूल करून घेण्याकरिता आपण विलायतेत एक वर्ष खर्ची घातले. या कालात आपण ज्या मुलाखती घेतल्या आणि आपल्या मोहक वाणीने व दूरदर्शीपणाने जबाबदार पुढाऱ्यावर जी छाप पाडली तिचा इष्ट परिणाम झाल्याविना राहणार नाही. आपल्या अनुयायांच्या सहाय्याने आपण मजूरपक्ष आपल्याकडे वळवून घेतला. आणि हाच पक्ष पुढे सत्ताधारी होणार असल्याने आपण स्वीकारलेले धोरण अगदी यथायोग्य आहे. इतक्या उतार वयात आपण इतकी कामगिरी बजावल्याबद्दल हिंदूराष्ट्र आपले अत्यंत आभारी राहील. असेच उपयुक्त राष्ट्रकार्य करण्याकरिता सर्व शक्तिमान परमेश्वर आपणास दीर्यायुष्य व वैभव देवो."