पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/४५४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१९ लो० टिळकांचे चरित्र भाग ६ मूळ फंड सुरू करणारानी ठरविले. हा आकडा प्रसिद्ध झालेला पाहून अँग्लो इंडियन पत्त्रांच्या कपाळात तिडीक उठली व त्यानी लगेच काही आश्चर्य दाख- वून काही टिळकांच्या अनुयायाना मोठेपणा देऊन आणि थोडेसे कुत्सितबुद्धीने वाचकाना सांगितले की " चिरोल साहेबानी खटला जिंकला त्याला या लोकानी तीन लाख रुपये जमवून पाहा कसे उत्तर दिले ते!” वास्तविक चिरोलवरील खटला टिळकानी दाखल केला त्यावेळी होता होईतो त्याचा खर्च आपला आपण करावा असे त्यांच्या मनाने घेतले होते. ताईमहाराजांचा खटला प्रिव्हि कौन्सिलात जिंकल्यामुळे या खटल्याचे बाबतीत त्याना उत्तेजन आले हे खरे. पण त्याबरोबर ताईमहाराज प्रकरणी त्यांचे जे पैसे खर्च झाले होते ते परत मिळण्याचीहि आशा वाटू लागली होती. आणि आपण फिर्याद जिंकली तर ही मोकळी झालेली रकम आपल्या खर्चाला पुरेल व आणखी थोडी लागली तर ती घालण्याला एकदोन वर्षे अवधि मिळेल असे त्याना वाटले होते. उलट निकाल आपल्या विरुद्ध गेला तर थोडा अधिक खर्च पडेल पण तो पडला तरी हे धाडस करून पाहावयाचे असे त्यानी ठरविले होते. ताई महाराज प्रकरणातील पैसे मोकळे झाले नसते, किंवा चिरोल खटला आपण हरलो तर २-३ लाख रुपये खर्च पडेल असे त्याना आगाऊ पक्के समजले असते तर त्यानी हे धाडस केले नसते. कारण लोका- कडून वर्गणी घेऊन हा खटला लढावा अशी त्यांची मनापासून इच्छा नव्हती. पण टिळक खटला तर हरलेच, शिवाय उलट सुलट खचीसकट एकंदर रकम २ ॥ - ३ लाखापर्यंत गेली, आणि टिळक तर विलायतेत अडकून पडले हे जेव्हा त्यांच्या मित्रमंडळीनी पाहिले तेव्हा त्याना ते फार मोठे संकट वाटून टिळ कांची परवानगी न घेता इतकेच काय पण त्याना ती गोष्ट कळण्यापूर्वीच त्यानी फंड उभारण्यास प्रारंभ केला होता. म्हणून टिळकानीहि त्या गोष्टीला नकार दिला नाही. कारण त्यानाहि हे माहीत होते की केसरीने निवळ आपल्या उत्पन्नातून हे कर्ज बारावयाचे असे ठरविले असते तर वाडा छापखाना वर्तमानपत्र सर्व काही गहाण पडून अनेक वर्षेपर्यंत जमा व खर्च यांची नुसती हातातोंडाशी गाठ पडली असती व सार्वजनिक कार्याला काहीच वाव राहिला नसता. ता. २७ नवंबर रोजी सकाळी टिळकांची आगबोट बंदरात आली पण दोन हरपर्यंत ती धक्क्याला लागली नाही. सकाळपासून हिंदू व मुसलमान स्वयंसेव- कांच्या तुकड्यानी बंदरावरील स्वागताची सर्व तयारी ठेविली होती. गर्दी होणार म्हणून पोलिसानी बंदराचे आवार ताब्यात घेतले आणि ज्यांच्या हाती पास होते अशाच लोकाना आत सोडण्यास सुरवात केली. गर्दीतून कशीबशी वाट काढून टिळकांना स्वयंसेवकानी बाहेर आणून मोटारीत बसविले आणि एका वेगळ्या रस्त्याने त्याना सरदारगृहात नेऊन पोहोचविले ! सायंकाळी ६ || वाजता शांतारामाच्या चाळीपुढे प्रचंड जाहीर सभा भरली. अध्यक्ष नॅपटिस्टा यानी टिळकांचे स्वागत केल्यावर गंगाधरराव देशपांडे यानी टिळकाना देण्याचे मानपत्र वाचून दाखविले. नंतर