पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/४५३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग ६ टिळक विलायतेहून परत येतात १८: यामुळे ती सर्व परत येईपर्यंत म्हणजे प्रायः पुढील डिसेंबरपर्यंत हिंदुस्थानातील राजकारणाचा भर ओसरून तो सहजच विलायतेत भरू लागला होता. ता. ३० मे रोजी मुंबई येथे शांतारामाच्या चाळीत मोठी सभा भरून टिळकांच्या आजपर्यंतच्या देशसेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. अध्यक्ष- स्थानी गांधी हे होते. ते म्हणाले "टिळकांचे व माझे मार्ग वेगळे आहेत. पण त्यांच्या स्वार्थत्यागाचे व विद्वत्तेचे गुण घेण्याचा जो जो प्रसंग असेल त्यात मी सामील होणारच. बिलायतेतील खटला टिळकांच्या विरुद्ध गेला म्हणून त्यांच्या- विषयीची लोकांची आदबुद्धी कमी झाली नसून उलट वाढलीच आहे. ज्याच्या पिशवीचे तोंड मोठे त्याची फत्ते हा न्यायच आहे. पण न्यायकोर्टाना मी कंटा- ळून गेल्यामुळे मला असे वाटते की टिळक हे केवळ सत्याग्रही असते तर काय बहार झाली असती ! तथापि या अपयशाने निराश न होता टिळकानी विलायतेतील आपली कामगिरी खंबीरपणाने चालविली आहे हे पाहून कौतुक वाटते. तरी इकडे आपण प्रयत्न करून त्यांच्यावरील खर्चाचा बोजा उठविला पाहिजे.” शेवटी शिवराम- पंत परांजपे म्हणाले " टिळक हे सत्याग्रही आहेत म्हणूनच त्यानी हा खटला विलायतेपर्यंत नेला. सत्याचा आग्रह गेल्या एप्रिलातच सुरू झाला असे नाही. तर तो फार पुरातन काळापासूनचा आहे. " जुलै महिन्यात टिळकांचा त्या सालचा वाढदिवस समारंभ विशेष रीतीने साजरा करण्यात येण्याची खटपट झाली. ही चळवळ मुख्यतः नरहर शिवराम ऊर्फ बाबासाहेब परांजपे यानी केली. प्रत्येक प्रांतातील पुढाऱ्यांच्या संम- तीने एकेक मंडळ नेमण्यात येऊन टिळकांचे अभिनंदन करणारे कार्ड एक रुपया देऊन लोकानी घ्यावे व ते सही करून कचेरीकडे पाठवावे अशी योजना होती. ता. २३ रोजी वाढदिवसाचा समारंभ अनेक प्रांतातून झाला व सर्वातर्फे म्हणून एक अभिनंदनपर तार बॅपटिस्टा यानी विलायतेस पाठविली. ता. १३ ऑगस्टपर्यंत टिळक पर्स फंडाची वर्गणी २ || लाखपर्यंत झाली. अद्याप प्रतिवादीना खर्चाबद्दल किती रक्कम द्यावी लागेल हे निश्चित कळले नव्हते. तथापि फंड गोळा करण्याचे काम बंद करावे असे टिळकांचे लिहून आल्यावरून तो १५ सप्टेंबर रोजी बंद करावा असे ठ ले. (६) टिळक विलायतेहून परत यतात. टिळक व त्यांजबरोबरची मंडळी हे विलायतेहून ता. ६ नोव्हेंबर रोजी इजिप्त नामक बोटीने निघाले ते ता. २६ रोजी मुंबईस येऊन पोहोचले. त्यापूर्वी ता. ८ नव्हेंबर रोजी टिळक फंडाच्या खजिनदारानी तोपर्यंतचे आकडे प्रसिद्ध केले त्यांची बेरीज जवळ जवळ तीन लाखापर्यंत येत होती. या रकमेत वाढदिवसानिमित्त झालेल्या रुपया फंडाचीहि पंचवीस हजारांची रक्कम होती. टिळक विलायतेहून आल्यावर पुढे केव्हातरी सवडीने ही सर्व रक्कम त्याना समक्ष अर्पण करावी असे