पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/४५१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग ६ चिरोल- केस - फंड १६ टिळकाना अगदी आयत्या वेळी जरूर तर खर्चण्याकरिता होमरूल लीगची काही शिल्लक विलायतेत होती. पण ती ताबडतोब भरूनहि पुरणार नाही व न जाणो एक दम टिळकांवर तेथे दिवाणी वारंट काढतात की काय किंवा इकडे तारेने दिवाणी वारंट पाठवून वाड्यावर व छापखान्यावर जप्ती आणतात की काय अशी काही लोकाना एक प्रकारची संदिग्ध भीति वाटू लागली. पुण्याहून टिळकाना तार करून नक्की आकडा काय तो कळवा असे विचारण्यात आले. पण त्याना तो लवकर कळविता येणे शक्य नव्हते. पण तो कळेपर्यंत थांबावयाचे नाही अशा निश्चयाने टिळकांवरील हे संकट निवारण्याकरिता एक मोठा फंड उभारावा व तो सुमारे दोन अडीच लक्षांचा तरी असावा असे ठरविण्यात आले. त्याप्रमाणे मुंबई पुणे वन्हाड नागपूर कर्नाटक वगैरे प्रांतातील पुढा-यांच्या सह्यानिशी एक खाजगी विनंतीपत्र काढण्यात आले व नंतर ते ता. ११ मार्चच्या केसरीत प्रसिद्ध झाले. या जाहीर विनंती- पत्रात असे लिहिले होते की " खटला बुडाल्याने सांपत्तिकदृष्ट्या टिळकांचा सर्व- नाश होणार आहे. आजवर या खटल्याच्या पायी टिळकाना दोन सव्वादोन लक्ष रुपये खर्च आला असावा असा आमचा अंदाज आहे. शिवाय चिरोल याना देण्याचा खर्च किती बसेल अपील झाल्यास त्याला खर्च किती लागेल या गोष्टी अद्यापि नक्की कळत नाही. तथापि टिळकांवर ऐन बोजा तीन लक्षांचा असावा असा अंदाज आहे. टिळकानी हा दावा सकृद्दर्शनी व्यक्तीचा म्हणून मांडला असला तरी त्याला सर्वस्वी राष्ट्रीयपक्षापुरते तरी सार्वजनिक स्वरूप आहे. आणि खट- ल्याचा निकाल अनुकूल झाला असता ज्याप्रमाणे त्याचे भूषण या पक्षाने पर्या- याने आपल्याकडे घेतले असते त्याप्रमाणे प्रतिकूल निकाल झाल्याची जबाब- दारीहि त्याने आपणावर घेतली पाहिजे आणि टिळकाना कर्जमुक्त केले पाहिजे. दोन वर्षापूर्वी ज्युबिली फंड हा आनंदाचा प्रसंग म्हणून आपण जमविला तर हल्लीचा प्रसंग संकटाचा आहे म्हणून जरूर ती रक्कम आपण उभी करण्यास राष्ट्रीयपक्षाला उत्साहच वाटला पाहिजे. आणि टिळकांचे संकट ते या पक्षातील प्रत्येक मनुष्याने आपले संकट असे मानल्यास जरूर ती रक्कम उभी करण्यास अडचण पडणार नाही. या कामी टिळकांचे स्वतःच्या सहीचे कर्जरोखे गुंतलेले असून त्यांची दहा हजारांची विम्याची पॉलिसी देखील गहाण पडली आहे हे सांगितले असता टिळकांवरील संकटाची कल्पना येईल. कार्याचे महत्त्व व राष्ट्रीयपक्षाच्या परीक्षेची ही वेळ लक्षात आणून सर्वानी वर्गणी द्यावी. या फंडाला कदाचित् इतर प्रांता- कडूनहि मदत मिळण्याचा संभव आहे. पण त्याची वाट न पाहता आपल्या पायावरच उभे राहून या रकमेची उभारणी इकडील राष्ट्रीय पक्षानेच केली पाहिजे." अशा अर्थाचे हे विनंतीपत्र असून त्यावर खापर्डे मुंजे अणे बेळवी देश- पांडे परांजपे देशमुख नेने वैद्य साठ्ये खाडिलकर व केळकर इतक्यांच्या सह्या होत्या. फंडाचे मुख्य खजिनदार अण्णासाहेब नेने व गणपतराव मराठे हे नेमण्यात आले आणि सर्व फंडाचा योग्य हिशेब लागावा म्हणून रुपयांच्या आकड्यांचा निर्देश