पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/४५०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१५ लो० टिळकांचे चरित्र भाग ६ हा प्रश्न आज सर्वाच्या पुढे असून हंटर कमिटीच्या रिपोर्टने त्या प्रश्नाची लव- करच वासलात लागणार आहे. या हंटर कमिटीच्या रिपोर्टीने हिंदी लोकांच्या काळजाला झालेलीहि जखम भरून येते का त्या जखमेत आणखी मीठ चोळले जाते याचाहि उलगडा लवकरच होईल. पंजाबात लष्करी कायद्यान्वये ज्या लोकाना शिक्षा झाल्या होत्या त्यांच्या- तर्फे विलायतेत प्रीव्ही कौंसिलपुढे अपील करण्यात आले होते. सर जॉन सायमन यानी अपील अर्ज गुदरून तक्रार सांगितली परंतु तिचा उपयोग न होता लॉर्ड हॉल्डेन यानी आपणाला हे अपील घेण्याचाहि अधिकार नाही असे ठरवून ते काढून टाकले. त्यानंतर इकडे पंजाब प्रकरणाची चौकशी करण्याकरिता स्कॉटलं- डातील एक न्यायमूर्ती लॉर्ड इंटर यांच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी नेमण्यात आली. पण काँग्रेसचे अध्यक्ष या नात्याने पं. मदनमोहन यानी या कमिटीच्या म्हणजे न्यायकोर्टाच्या घटनेविरुद्ध जाहीर तक्रार केली. ता. १० सप्टेंबर रोजी भरलेल्या कायदेकौन्सिलात त्यासंबंधाने त्यानी एक ठरावहि मांडला पण तो बहु- मताने नामंजूर झाला. हंटर कमिटीवर फक्त दोनच हिंदी गृहस्थ नेमण्यात आले. एक अलाहाबादचे जगत् नारायण व मुंबईचे चिमणलाल सेटलवाड या कमिटी- पुढे डायर - ओड्वायर वगैरे लोकांच्या साक्षी व्हावयाच्या होत्या आणि न जाणो कदाचित् या चौकशीतून काही अधिकान्यांचे काही अपराध अक्षम्य असे निष्पन्न झाले तर कायद्याच्या कचाटीत ते सांपडावयाचे म्हणून त्याना कायदेशीर अभय- वचन देण्याकरिता 'माफीचे बिल' म्हणून एक बिल सरकाराने कौंसिलपुढे आणून झटपट मंजूर करून घेतले. ज्याना निष्कारण कैदेच्या शिक्षा झाल्या ते अजून तुरुंगातच होते. आणि जे फुकट मारले गेले ते तर मेलेच. पण ज्यानी हे अन्याय केले त्यानी चुकून माकून फसगमतीने कायद्याच्या तडाक्यात सापडू नये म्हणून ही आगाऊ तरतूद करण्यात आली होती ! (५) चिरोल - केस - फंड असो. असहकारितेच्या चळवळीचा वरील प्रकार मूळ उगम होय इतके सांगून दुसरीकडे वळू. ता. २१ फेब्रुवारी रोजी चिरोल खटल्याचा निकाल टिळकांविरुद्ध झाला. त्याची तार प्रथम सरकारला येऊन ती दिल्लीस २२-२३ तारखेला प्रसिद्ध झाली. व खाजगी तार म्हणून नंतर मुंबईला ता. २४ रोजी प्रसिद्ध झाली. यानंतर पुण्यामुंबईस टिळकांकडील तारा आल्या. त्यात 'खर्चासह दावा काढून टाकला' इत काच मजकूर होता. दावा बुडाल्याने टिळकांवर इतर परिणाम काय होणार हा प्रश्न वेगळाच पण त्यांच्यावर खचीची तोहमत किती येणार हीच त्यांच्या स्नेहीमंड- ळांना प्रथम व सर्वात मोठी काळजी पडली. नक्की आकडा कळला नव्हता तरी हा दोनतीन लाखांचा प्रश्न आहे अशी कल्पना पूर्वी थोडथोडी आली होती. व एवढी धोंड आली तर ती कशी निवारावी याचा विचार करणे प्राप्तच होते.