पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/४४९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग ६ अमृतसरच्या लोकांचा छळ १४ असताना मि. आयव्हिंग हे एकदम उसळून म्हणाले ' खानसाहेब गप्प बसा. तुम्ही लोकानी मला जी भलतीच बातमी दिली त्याचा हा सगळा परिणाम आहे !' अशा रीतीने ही टोलवाटोलवी करण्याचा निंद्य प्रयत्न दुसरे दिवसापासून सुरू झाला. कत्तल करण्याचा हुकूम डायरने दिला असल्याने त्याच्यावरची जबाबदारी नाहीशी होऊ शकत नाही हे खरे. परंतु मि. आयव्हिंग हेही या दोषाचे बरो- बरीने हिस्सेदार आहेत. परंतु काँग्रेस कमिटीने मि. आयव्हिंग यांची चौकशी व्हावी अशी शिफारस केली नाही याचे सखेदाश्चर्य वाटते. हंटर कमिटीच्या रिपोर्टात ही उणीव भरून काढली जाते की काय पहावे ! या अमानुष कत्तलीशिवाय इतर रीतीनेही अमृतसरच्या निरपराधी लोकांचा अत्यंत छळ करण्यात आला. त्यात फटके मारणे पोटाने सरपटावयास लावणे वगैरे अमानुष प्रकार सर्वश्रुतच आहेत. पण त्या सर्वापेक्षा खोट्या साक्षी देण्यासाठी झालेला छळ फारच भयंकर असून रक्ताचे पाणी करून सोडणारा असल्याने त्याचा तेवढा उल्लेख करून ही हृदयद्रावक कहाणी तूर्त संपवू. काँग्रेस कमिटीच्या रिपोर्टात असली शेकडो उदाहरणे नमूद आहेत. पण त्यातल्यात्यात मौलवी गुलाम झिलानी याची हकीकत आंगावर शहारे आणणारी आहे. डॉ. किचलू डॉ. सत्यपाल मि. बाशीर यांच्या विरुद्ध साक्ष देण्याकरिता गुलाम झिलानी यांचा अत्यंत क्रूरपणे छळ करण्यात आला. त्या छळाच्या प्रकाराचा उच्चार करणे देखील किळसवाणे असल्याने ती हकीकत सविस्तर देता येत नाही. खोटी साक्ष देण्याच्या धमकीतून स्त्रिया देखील सुटल्या नाहीत हे मिसेस नेली बेंजामिन हिच्या साक्षीवरून सिद्ध होते. या छळाची ही कहाणी जितकी लांबवावी तितकी लांबणार परंतु विस्तारभयास्तव ती संपविणे जरूर आहे. तथापि या छळात हिंदी लोकाना औषधोपचाराची व डॉक्टरांची मदत न मिळाल्याने त्यांचे झालेले हाल व झालेली प्राणहानि ही अत्यंत शोचनीय व गईणीय होय. रात्री आठ वाजल्या- नंतर कोणीहि घराबाहेर पडूं नये हा जुलमी हुकूम निदान डॉक्टराना तरी लागू केला नसता तर जालियनवाला बागेत जखमी झालेले काही इसम तरी प्राणास मुकले नसते. शेरवुडलेनमधून पोटाने फरपटल्याशिवाय जाण्याचा हुकूम नसल्याने आजारी इसमास डॉक्टराची मदत मिळू शकली नाही व त्यामुळे माझा मुलगा मृत्यूच्या दाढेत सांपडला असली केविलवाणी जबानी वाचून कोणाच्या काळजाचे पाणी होणार नाही ? असे एक ना दोन तर शेकडो प्रकार या रिपोर्टात नमूद आहेत. असली मनुष्यत्वाला लाज आणणारी कृत्ये या विसाव्या शतकात ब्रिटिश राज्यात न्यायाकरिता व सत्याकरिता महायुद्ध करून जय संपादन केल्यानंतर त्या विजयाला कारणीभूत झालेल्या पंजाबी लोकात घडून यावी हे देशाचे दुर्दैव होय ! ता. १३ एप्रिल १९१९ पासून अमृतसर वगैरे ठिकाणच्या पंजाबी लोकावर जो असह्य छळ सोसण्याचा प्रसंग आला तसा प्रसंग वैऱ्यावरहि येऊ नये. पण ज्यानी तसा प्रसंग आणला त्या उद्दाम अधिकाऱ्याना ब्रिटिश पार्लमेंट कोणती शिक्षा करणार