पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/४४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग १ सर फेरोजशहा मेथा. गवगवा केला पण त्यांत मेथा हेच यशस्वी झाले. कायदेकौन्सिलात मुंबई म्युनि सिपालिटीला एक प्रतिनिधि निवडण्याचा हक्क मिळाला तेव्हापासून अनेक वर्षे त्या जागेवर त्यांच्याशिवाय दुसऱ्या कोणाची निवड झाली नाही. पण हे वर्चस्व मिळण्याला त्यांचा एक गुण विशेष कारणीभूत झाला तो हा की, कॉरपोरेशनमधील समाना नियमितपणे हजर राहून काम करण्याविषयी त्यानी दक्षता ठेवली. आणि या सभांच्या दिवशी लाभदायक अशी वकीलपत्रे आली तरी ती ते नाकारीत व आठवडयातील हे दिवस रोजनिशीत प्रायः मोकळे राखून ठेवीत. वरिष्ठ कायदे- कौन्सिलात निवडणुकीचा अधिकार मिळाला तेव्हा प्रथम त्यांचीच निवडणूक झाली. आणि पुढेहि अनेक वर्षे ते निवडले जात. पण गोपाळराव गोखले याना पुढे करून त्यानी तरुण पिढीविषयी गुणग्राहकता दाखविली. कायदे कौन्सिलात लोकपक्षाला बहुमत नसल्याकारणाने मेथा सारख्यानाही टीका करण्यावरच आपले कर्तव्य व हौस भागवून घ्यावी लागे. पण ही टीका करण्यात त्यानी जो वाणेदारपणा व धीटपणा दाखविला तो वाखाणण्यासारखा होता. सरकारी सेक्रेटरी, मेंबर वगैरे लोक त्यांचे टीकेला नेहमी भीत असत. कारण ते कोणावर तुटून पडले म्हणजे त्याची काही बाकी ठेवीत नसत. राजकारणात तात्त्विकदृष्ट्या ते नेमस्त असत. पण स्वाभिमानाची गोष्ट आली म्हणजे ते जहालाहून जहाल होत. वरिष्ठातल्या वरिष्ठ युरोपियनाना ते बरोबरीच्या नात्याने वागवीत आणि वेळ पडली असता त्याना ते तोडून टाकीत. त्यांच्या तात्त्विक नेमस्तपणावरून अधिकाऱ्याना असे वाटे की स्वराज्य पक्ष व नवीन मताचे लोक यांचेविरुद्ध मोहीम करण्याला मेथा हे आपणास मदत करतील. आणि त्यानी ही मोहीम केली ही गोष्टहि खोटी नाही. पण 'मला वाटेल ते. मी करीन, माझ्या लोकाना मी बोलेन परंतु या कामात तुमचे माझे संगनमत होणे शक्य नाही, किती केले तरी ते लोक माझे आहेत आणि तुम्ही लोक तरी काय मोठे गुणवान आहात' ? असे ते अधिकाऱ्याना बजावीत. या त्यांच्या वृत्तीमुळे लॉर्ड सिडनहॅमचा व त्यांचा उघड बेबनाव झाला होता. मुंबई युनिव्हर्सिटी मध्येहि त्यानी बरेच काम केले. आणि सरकाराने तेलंग चंदा- बरकर भांडारकर यांच्याप्रमाणे त्याना जरी कधी व्हाईस चॅन्सेलरची जागा दिली नाही तरी म्युनिसिपालिटी प्रमाणे युनिव्हर्सिटीतहि ते पुढारी म्हणूनच गाजत असत. तेथेहि अधिकाऱ्यांचा व त्याचा खटका उडे राष्ट्रीय सभेचे ते प्रारंभीच्या वर्षातच अध्यक्ष होऊन गेले. आणि सुमारे वीस बावीस वर्षे कांग्रेसची सूत्रे मुंबईस त्यांच्याकडूनच हलविली जात. इतर प्रांतात त्यांच्या बरोबरीचे पुढारी प्रायः नव्हते व जे होते तेहि त्याना दबून वागत. मुंबई शहराची अघाडी राजकारणात ठेवण्याचे पुष्कळसे श्रेय मेथा. यांच्याकडेच आहे. गोखले याना ते एखाद्या शिष्याप्रमाणे किंवा मुलाप्रमाणे वागवीत. पण राजकीय विषयाच्या अभ्यासात परिश्रमात आणि विशेषतः स्वार्थत्यागात त्यांची मजल आपल्यापुढे पुष्कळच आहे हे ते ओळखून टि० उ... ३.