पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/४४७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भांग ६ अमृतसरच्या लोकांचा छळ १२ देहांचा एवढा खच पडला होता व कोणाच्याच ओळखीचे नसलेले परस्थ लोकहि त्यात इतके होते की सर्व प्रेतांची तपासणी व विल्हेवाट रात्री ८ वाजेपर्यंत होऊ शकली नाही. आणि रात्री ८ वाजल्यानंतर बाहेर पडणाऱ्यास गोळी घालून ठार करण्याची द्वाही फिरली असल्याने बरीच प्रेते बरेच जखमी इसम यांची रात्रभर विल्हेवाट लागली नाही. त्या गर्दीत कित्येक जखमी इसमास वेळेवर पाणीहि न मिळाल्याने ते गतप्राण झाले. त्या भयानक रात्री त्या बागेतील देखाव्याची कल्पना येण्यास निशाणी नं. ७५ ची साध्वी रतन देवी या स्त्रीची जवानी वाचावी. या साध्वीचा पति घरी न आल्याने तिने बागेत जाऊन पतीचे प्रेत धुंडाळून काढले. तितक्यात आठ वाजल्याने सर्व रहदारी बंद झाली व आळोआळी फिरून तिने आपल्या पतीचे प्रेत घरापर्यंत पोचविण्यास मदत करण्याविषयी विनवणी केली असता गोळीबाराच्या दहशतीने कोणीहि घर सोडून बाहेर येईना ! तेव्हा ती बिचारी त्या कत्तलखान्यात परत पतीच्या प्रेताशेजारी जाऊन बसली. लवकरच त्या मसणवटीत कुत्र्यांचा धुमाकूळ सुरू झाला. तेव्हा रतनदेवीने कुत्र्यापासून आपला स्वतःचा व नवऱ्याच्या प्रेताचा बचाव करण्याकरिता तेथेच पडलेली एक काठी हातात घेतली व कुत्र्याना दटावीत ती काळरात्र त्या स्मशानात घालविली ! ज्यांचा प्राण अद्यापि गेला नव्हता अशांचे विव्हळणे कुत्र्यांचे भुंकणे दिवा- भीतांचा घूत्कार घड्याळाचे ठोके व आपल्या धडधडणाऱ्या छातीचे ठोके याखेरीज दुसरे काही तिला ऐकू येत नव्हते ! अशा भयानक रात्रीतहि एक दोनदा काही इसम त्या बागेत आले ! रात्री बाहेर पडण्याचा हुकूम नसता हे इसम निर्भयपणे आले कसे व गेले कसे ? कोणा आसाच्या प्रेताच्या शोधासाठी ते आले होते म्हणावे तर पुष्कळशी प्रेते त्यानी धुंडाळून व चाचपून पाहिली खरी पण एकहि प्रेत उचलून नेले नाही. कित्येक प्रेतांच्या अंगावर दागिने होते खिशात घड्याळे होती कप्यात नोटा व रोकडहि असेल. परंतु सकाळी पहावे तो सर्व काही झळझळीत झाले होते ! अशा रीतीने ही काळरात्र निघून गेल्यावर सूर्योदय होताच पुनः प्रेते शोधून घेऊन जाण्याचा व त्यांचा अंत्य संस्कार करण्याचा धुमधडाका सुरू झाला. किती इसम मृत्युमुखी पडले याची नोंद या वेळी अधिकाऱ्यानी केलीच नाही. पण पुढे चार महिन्यानंतर ज्या कोणाचे आत- इष्ट त्या कत्तलीत मेले असतील त्यांची चौकशी करून नावे नोंदविण्याचा जाहिर- नामा लागला ! ही कत्तल झाल्यानंतर अधिकारीवर्गात चर्चा होऊन तिच्या युक्तायुक्तते- बद्दल कोणाचे काय मत झाले असेल ते असो. पण ही कत्तल चालू असता पोलिस अधिकारी मि. रोहिल व जव्हारमल याना तो देखावा पाहावेना म्हणून ते बागेच्या बाहेर गेले होते. डे, कमिशनर मि. आयव्हिंग याला मात्र त्याची दिक्कत न वाढून उलट आपले समर्थन करण्याकरिता त्याने एक जाहिरनामा काढला. त्यात जनरल डायर व त्यांचे शिपाई बागेत आले असता लोकानी त्यानाच दटाव-