पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/४४६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

११ लो० टिळकांचे चरित्र भाग ६ हंसराज हा लष्करी शिपायानी व्यापलेल्या दरवाज्याकडेच गेला व तो त्या दरवाज्यानेच बाहेर पडला. या 'घुशीच्या सांपळ्यातून बाहेर पडलेला प्रत्येक इसम तातडीने आपल्या घराकडे जात असता हंसराज मात्र घराकडे न जाता आपण सुखरूप असल्याचा नुसता निरोप घराकडे पाठवून हॉल बझार- कडे चालता झाला ! अशा या इसमास हंटर कमिटीपुढे साक्षीला न आणता मेसापोटेमियात पाठवून देण्यात आले. या सर्व गोष्टीवरून हा 'घुशीचा सापळा' कसा बनवला गेला हे उघड होत आहे. लाला हरकिसनलाल यांचे जालंदरच्या प्रांतिक परिषदेत जे भाषण झाले त्यात ते म्हणतात की " काँग्रेस कमिटी पुढे या गोष्टीचा स्पष्ट निर्णय करणारा पुरावा दाखल झाला होता. परंतु तो पुरावा जाहीर करण्याला साक्षीदारांची संमति नसल्यामुळे कमिटीने स्पष्ट निर्णय दिला नाही. पण असे करणे हा सत्याग्रहाचा अतिरेक होय ! " मि. थॉमसन यांच्या मताप्रमाणे अवघे २९० इसम मृत्यु पावले नसून मेले- ल्यांची संख्या एक हजारावर व दगावलेल्यांची संख्या आणखी एक हजारावर गेली हे या रिपोर्टातील शेकडो जबान्यावरून सिद्ध आहे. पण या कत्तलीत सात महिन्यापासून सत्तर वर्षापर्यंत सर्व वयाची माणसे होती व त्यात साधु बैरागीहि होते व स्त्रियाहि होत्या हे बहुतेकास अवगत नाही. परंतु निशाणी नंबर २४ ४५ ४६ ५०५२ ७६ वगैरे जबान्यावरून ही गोष्ट कळून येते. एकंदर समाज २० हजारापर्यंत असून त्यात अल्पवयी मुळे ४००/५०० होती ! या गोळीबाराने जितके अधिक बळी घेता येतील तितके घेण्याचा डायरचा निश्चय स्वतः त्याच्याच जवानीवरून उघड झाला असून या रिपोर्टातहि त्यास प्रत्यंतर सांपडते. गोळीबार सुरू झाल्यावर कित्येक इसम जमिनीवर लोळण घेऊन आपला बचाव करून घेऊ लागले तेव्हा शिपायाना खाली बसून गुडघे टेकून खाली नेम धरण्याचा हुकूम देण्यात आला. व हा हुकूम नीट बजावला जात नाही असे पाहताच एका ऑफिसरने शिपायाना शिव्या हासडून रिव्हॉल्व्हरचा धाक घालून बंदुका खाली रोखण्यास भाग पाडले! ज्यास्तीत जास्त प्राणहानि होण्याकरिता हंसराजाने तर सर्व उपाय योजले होतेच. पण त्याशिवाय ज्यावेळी लष्करी शिपाई बागेच्या दरवाज्यात शिरत होते त्यावेळी जे इसम बाहेर जात होते त्याना दरडावून बागेत जावयास लाविले. साध्वी रतन देवी अशा रीतीने जाणून बुजून शक्य तितक्या अधिक इसमांची कत्तल करून केवळ दारूगोळा संपल्यामुळे आणखी प्राणघात करण्याचे साधन न राहिल्याने डायरची स्वारी परत निघून गेल्यानंतर, त्या बागेत व आसपास जो करुण रौद्र बीभत्स व भयानक या रसानी परिपूर्ण असा देखावा दिसू लागला त्याचे वर्णन करणे अशक्य आहे ! ज्यांचे जे कोणी आत घरी आले नाहीत त्याना शोधून काढण्याची धांदल रात्री ८ वाजेपर्यंत चालली होती. पण प्रेतांचा व मृतप्राय