पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/४४५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग ६ अमृतसरच्या लोकांचा छळ करणार आहे सच तुम्ही शहरात जाऊ नका अशी इषारत दिली होती ! मि. वॅथन यानी मात्र डोके शांत ठेवले असून भडिमार करण्याच्या सूचनेला हरकत घेतली. ज्यांचा दंग्याशी काही संबंध नाही असे दोघे नेत्र रोगी शीख आपल्या डोळ्यावर शस्त्रक्रिया करून घेण्याकरिता याच कर्नल स्मिथकडे आले असता जा गांधीकडे जा म्हणजे ते तुमचे डोळे नीट करतील' असला उद्धट जबाब देऊन त्याने त्यास इस्पितळातून घालवून दिले ! याच कर्नल स्मिथने जालियन- वाला बागेत जखमी झालेले काही इसम इस्पितळात आले असता 'या पिसाळ- लेल्या कुत्र्याना येथून हाकलून लावा. गांधी सत्यपाल व किश्चलू हे त्याना औषधो- पचार करतील' असे उद्गार काढले ! डॉ. सत्यपाल व किचलू याना हद्दपार कर ण्याचा हुकूम आला असून देखील त्याची बजावणी करण्याचा डे. कमिशनरला विचार पडला असता, याच कर्नल स्मिथने लाहोरला मुद्दाम जाऊन ले, गव्हर्नर- कडून हुकमाची बजावणी करण्याविषयी हुकूम आणला ! घुशीचा सापळा असत. डॉ. फिर्याद कर- १३ च्या पूर्वी ता. १३ रोजी जालियनवाला बागेतील कत्तल झाली हे सर्वश्रुतच आहे. हा 'घुशीचा सापळा' कसा तयार केला गेला हे गूढ उकलणे कठिण नाही. लाला कन्हयालाल हे अध्यक्षस्थान स्वीकारणार आहेत असे जाहीर करण्यात आले होते पण लाला कन्हयालाल याना त्याची वार्ताहि नव्हती. लालाजीना वार्ताहि नसता त्यांच्या नावाचा उपयोग करण्यात आला याचा अर्थ काय हे ज्याचे त्याने ओळखावे असे कन्हयालाल हे आपल्या साक्षीत म्हणतात व वाच- काना त्याचा अर्थ लक्षात येईलच. जालियनवाला बागेतील सभा बोलावणारा हंसराज याच्या कित्येक गुप्तपोलीस अधिकाऱ्याशी मुलाखती होत सत्यपाल याना हद्दपार केल्यावर हरताळ पाडा व डे. कमिशनरकडे याला चला म्हणून लोकाना चिथावणारा इसम हाच ! ता. सी. आय. डी. च्या अधिकान्याशी याची मुलाखत झाली होती. ता. १३ रोजी जालियनवाला बागेत सभेच्या तयारी करिता जागा साफसूफ कर- विली प्लॅटफॉर्म तयार करविला डोकीवर विमान घिरट्या घालू लागले असता सभा सोडून बाहेर जाऊं नका असे श्रोत्यास सांगितले. ही सर्व कारवाई चालू असता उघड व गुप्त पोलिसांचे अधिकारी सभेच्या जागी येत व त्यांच्याशी हंसराजाचे बोलणे किंवा खाणाखुणा होत. डोकीवर विमान घिरट्या घालू लागताच गुप्त पोलीस अधिकारी बागेतून निघून शेजारच्या घरात जाऊन बसले. विमान निघून गेल्यानंतर अर्ध्या तासात लष्करी लोकानी बागेचे तोंड व्यापिले व गोळीबार सुरू होण्यापूर्वी हंसराजाने हातरुमाल उडवून खूण केली व नंतर तो प्लॅट- फार्मवरून उतरला ! इतर लोक घाबरून भिंतीवरून उड्या टाकीत असता टि० उ...३२ याच इसमाने