पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/४४४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

लो० टिळकांचे चरित्र भाग ६ लागले त्या यमयातनांची त्रोटक कहाणी आजच्या या प्रसंगी बाचकास सादर करण्यात येत आहे. यात ज्या गोष्टी आतापर्यंत जगजाहीर झाल्या आहेत त्यांची पुनरावृत्ति शक्य तितकी टाळून आतापर्यंत अप्रसिद्ध पण काँग्रेस कमिटीच्या रिपोटांत प्रसिद्ध झालेली अशी हकीकत देण्यात येत आहे. डॉ. किश्चलू व सत्यपाल याना विश्वास दाखवून बोलावून आणून पकडून हद्दपार केल्यावर ता. १० रोजी अमृतसरचे नागरिक डे. कमिशनरकडे फिर्याद करण्याकरिता जात असता रेल्वे लाइनवरील दोनहि पुलांचे रस्ते बंद करण्यात अधिकाऱ्यांची चूक झाली. हे रस्ते बंद केले नसते तर डे. कमिशनरच्या जीवास अपाय झाला असता • कल्पना चुकीची आहे. कारण रस्ता बंद केल्यामुळे दंगा सुरू झाल्याबरोबर गोळीबार सुरू केल्यावेळी डे. कमिशवर तेथे होते. परंतु कोणीहि त्यांच्यावर हल्ला केला नाही किंवा त्यास अपाय करण्याचा प्रयत्नही केला नाही. असे असून पुलावरील लोकाना मागे परतण्यास सांगण्याचा मि. मलबुल महंमद व मि. सालेरिया हे प्रयत्न करीत असता त्याना बाजूस होण्याविषयी सूचना न देता एकदम गोळीबार सुरू करण्यात आला. त्यात हे वकील स्वतः बळी पडले नाहीत हा दैवयोगच होय. हा गोळीबार सुरू होताच लोक परतू लागले असता गोळीबार बंद न होता तो तसाच चालू राहिला. व त्यामुळे जे २०।२५ लोक मृत्युमुखी पडले त्यातल्या बहुतेकाना गोळ्यांच्या जखमा पाठीवर झाल्या होत्या. व त्याहि कमरेच्या भागास न होता वरच्या भागास झाल्या होत्या. जायबंदी झालेल्या इसमांस दवाखान्यात नेण्यास डोल्या आणल्या नव्हत्या व मागाहूनहि आणू दिल्या नाहीत. वेळेवर औषधोपचार झाला असता तर काही जखमी इसम मृत्यूच्या दाढेतून वाचले असते. जखमी इसमांस सिव्हिल हॉस्पि- टलमध्ये थारा मिळाला नाही हा प्रकार तर फारच गर्हणीय आहे. ता. ११ पासून चार पाच दिवस शहरातील पाण्याचे नळ व विजेचे दिवे बंद करण्यात आले व त्यामुळेहि लोकांचे अतोनात हाल झाले ता. १० रोजी शहरात जाळपोळ व नॅशनल बँकेची लूट झाल्यानंतर ता. ११ रोजी अधिकारीवर्गाचे खलबत चालू असता डे. पो. क. मि. मिसूर म्हणाले की 'युरोपिअनांच्या एकेका खुनाला नेटिव्हांचे हजारो मुडदे पाडले पाहिजेत !' याच खलबतात शहरावर तोफांचा भडिमार करून अर्ध्या तासात शहर उध्वस्त करण्याच्या क्लुप्तीची भवति न भवति झाली. त्या वेळी लाला धोलनदास यानी स्पष्टपणे असे बजावले की सुवर्णमंदि- रास जर यत्किंचितहि धक्का लागला तर पंजाबात शांतता प्रस्थापित होण्याची आशाच बाळगू नका. ही सुवर्ण मंदिराची अडचण झाल्यामुळेच शहराचा बचाव झाला असे म्हणण्यास हरकत नाही कारण शहरावर तोफा डागण्याच्या कल्पनेची जल शाब्दिक चर्चेच्या पुढे जाऊन कोणत्या बाजूने कसा मारा करावा याचा नकाशाहि तयार झाला असून सिव्हिल सर्जन कर्नल स्मिथ याने आपले असि- स्टंट डॉ. धनपतराय यास आणखी अर्ध्यातासाने जनरल डायर शहरावर मारा