पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/४४३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग ६ अमृतसरच्या लोकांचा छळ ८ होते. पण त्यालाहि लोक घाबरले नाहीत किंवा गांगरून गेले नाहीत. पोलिससंबंधी आम्हाला कोणत्याहि प्रकारचा द्वेष वाटत नाही. पण या अत्याचारामुळे लोकांचा सरकारच्या न्यायबुद्धीवरील विश्वास उडाला आहे. " प्रेतांची जंगी अपूर्व मिरवणूक रविवारी हा शोचनीय प्रकार घडल्यावर सोमवारी मयत इसमांची प्रेते मागण्यात आली. अधिकान्यानी प्रथम टोलवाटोलवीच केली. पण अखेरीस प्रेते स्वाधीन करण्यात आल्यावर हिंदू व मुसलमान हा भेदभाव विसरून जाऊन उभय धर्मीयांच्या बळी गेलेल्या इसमांच्या प्रेतांची जोड मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीला दहा हजारपर्यंत इसम हजर होते. ही मिरवणूक क्लॉक टॉवर- जवळ आल्यावर ज्या ठिकाणी हिंदू व मुसलमान वीरानी सत्याग्रहाच्या यज्ञात आपले बळी दिले तेथील रक्तस्रावाने पवित्र झालेल्या भूमीवर हिंदू व मुसलमान यांच्या एकीचे दृढीकरण करण्यात आले आणि नंतर हिंदूंची प्रेते स्मशानाकडे व मुसलमानांची दफनभूमीकडे नेण्यात आली. या दंग्यास सुरुवात कशी झाली एकंदर प्रकार काय घडला व रक्तपाता- बद्दल जबाबदार कोण याची चौकशी करण्याकरिता नागरिकांच्या वतीने बिन- सरकारी इसमांचे कमिशन नेमिले असून सिव्हिल हॉस्पिटलमधील जखमी लोकांच्या साक्षी घेण्यास सुरुवात झाली आहे. सरकारनेहि आपले कमिशन नेमून चौकशी करावी अशी मागणी करण्यात आली पण ती नाकारण्यात आली. मंगळवारपासून दिल्लीतील सर्व व्यवहार पूर्ववत सुरू झाला आहे. परंतु लष्कर व पोलीस यांच्या जोरावर आम्ही दंगा मोडून शांतता प्रस्थापित केली ही अधिकान्यांची बढाई खरी नसून हकीम अजमलखान सुलतानर्सिंग वगैरे लोक- मान्य पुढाऱ्यानी जेव्हा आश्वासन दिले आणि लष्करचे लोक शहरातून काढून न्या म्हणजे पूर्ववत् व्यवहार चालतील असे सांगितले तेव्हा अधिकान्यानी लष्कर काढून नेल्यावर शहरात पूर्ववत् व्यवहार सुरू झाले. (४) अमृतसरच्या लोकांचा छळ [ ता. १३ एप्रिलच्या १९२० च्या केसरीतील उतारा ] पंजाबात अमृतसर येथे सुवर्ण मंदिराशेजारी जालियनवाला बागेत जनरल डायर याने निरपराधी आबालवृद्धांची कत्तल केल्यास आज तारखेस बरोबर एक वर्ष झाले. या दुःखद गोष्टीच्या स्मरणार्थ आज रोजी हजारो ठिकाणी जाहीर सभा भरविण्यात येतील व डायर याच्या अमानुष कृत्यांचा निषेध करून जालि- यनवाला स्मारक फंड जमा करण्यात येईल. या कत्तलीची बरीच साम्र हकीकत आतापर्यंत वाचकास अवगत झालीच आहे. तथापि एका वर्षापूर्वी अमृतसरच्या लोकास जे जे अनेकविध अकल्पित असह्य हाल व उपमर्द अकारण सोसावे