पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/४४२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

लो० टिळकांचे चरित्र जाहीर सभेची हकीकत भाग ६ इकडे हा रक्तपाताचा प्रकार झाल्यावर सायंकाळी काँग्रेसच्या मंडपाच्या मैदानावर स्वामी श्रद्धानंद ( पूर्वाश्रमीचे गुरुकुलाचे संस्थापक लाला मुनशीराम ) यांच्या अध्यक्षतेखाली १५ हजार लोकांची जाहीर सभा भरली. या सभेला हर- कत करण्याचा दोन वेळ प्रयत्न करण्यात आला. दुसऱ्या वेळी तर चीफ कमि- शनर व डि. मॅ. हे सभेच्या जागी हजर होऊन त्यानी सभा बंद करण्यास सांगि- तले. परंतु सभेचे सर्व काम अत्यंत शांतपणे चालेल व सर्व श्रोतृसमूह माझ्या हुकमतीप्रमाणे वागेल असे स्वामीजीनी आश्वासन दिले व त्यास श्रत्याकडून होकार मिळाला तेव्हा अधिकाऱ्यांची काही डाळ न शिजून ते निघून गेले व सभेत रौलेटविलाचा निषेध करून स्टेटसेक्रेटरीनी त्यास संमति देऊ नये असा ठराव पास करण्यात आला. सभेचे काम आटपून लोक घरोघर जात असता स्वामी श्रद्धानंदजी यांचेवर जो प्रसंग गुदरला होता व त्यात त्यानी जे अलौकिक धैर्य दाखविले त्याची हकीगत त्यांच्याच शब्दानी देणे बरे. ती हकीगत अशी स्वामी श्रद्धानंद यांची हकीगत " जाहीर सभा आटपल्यावर आम्ही मोठ्या शिस्तीने शहरातून चाललो होतो. आम्ही क्लॉक टॉवरपाशी आलो त्या वेळी गुरखे लोकांचा त्या रस्त्यावर पाहरा ठेवण्यात आलेला आम्हाला दिसला. आम्ही आल्यावर गुरखे अर्थातच एका बाजूला सरले. पण एका गुरख्याने हवेत बंदुकीचा बार केला. बार होण्याबरोबर माझ्याबरोबर असलेल्या लोकात चलबिचल झालेली दिसली. पण मी सर्वाना स्वस्थ उभे राहण्यास सांगितले. त्याबरोबर जागचे जागी ते स्वस्थ उभे राहिले. गुरखे उभे असलेल्या ठिकाणी मी एकटाच गेलो. व निरपराधी लोकावर तुम्ही गोळ्या का झाडता ? असा मी त्याना सवाल केला. लगेच दोन गुरख्यानी माझ्या- वर रायफली रोखून ' तुमकू छेद देंगे' असे ते दरडावून म्हणाले, 'मैं खडा हूं गोली चलाव' असे मीहि त्याना सांगितले. इतक्यात आठदहा रायफली माझ्यावर रोखल्या गेल्या. गुरख्यांच्या धमकावण्या चालूच होत्या. आता मात्र लोकाना दम धरवेना. 'तुम मत मरो हम मर जायेंगे' असे म्हणून लोक पुढे घुसण्याच्या बेतात होते. पण मी हाताने खूण केल्यावर लोक जागच्या जागी थबकून राहिले. इतक्यात एक युरोपिअन अधिकारी त्या ठिकाणी दाखल झाला व गुरख्यानीहि आपापल्या रायफली परत घेतल्या. गोळ्या झाडण्याबद्दल आपला हुकूम होता काय व आपण गोळीचार ऐकला काय असे मी त्यास विचारले. तेव्हा पहिल्याने नकारार्थी उत्तर देऊन गोळीबारासंबंधाने मी चौकशी करतो असे त्याने दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर दिले. नंतर तेथून आम्ही पुढे चाललो. इत- क्यात एक गुरखा आपली कुकरी फिरवीत आमच्यावर चाल करून आला. पण असल्या धमकावणीला कोणीहि दाद दिली नाही. मशीनगनचे भेडसावणे चालूच