पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/४४१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग ६ सत्याग्रहाची हकीगत होते. पण दंगेखोरांचा जमाव इतका मोठा व इतका नजीक होता की एकाने तर शिपायाच्या हातची बंदूक हिसकून घेण्याचा प्रयत्न केला व त्याला संगिनीने भोकसावे लागले. " ही परिस्थिति पाहताच पोलीस सुपरिंटेंडंटने गर्दी मोडण्याकरिता आपल्या घोडेस्वारासह गदींवर चाल केली व जमावास दुभंगून स्टेशनचा दरवाजा व समोरचा रस्ता मोकळा केला. दंगेखोराकडून विटांचे तुकडे फेकण्यात येत होते व त्यातले काही तुकडे स्वतः पोलीस सुपरिंटेंडंट व त्यांचे असिस्टंट डि. ट्रॅफिक सुपरिंटेंडेंट आणि अॅ. डि. मॅजिस्ट्रेट यानाहि लागले. याप्रमाणे लम्करपोलीस आणि दंगेखोरांचा जमाव यांच्यामध्ये दोन तास झटपट चालल्यावर २-३० वाजता सुपरिंटेंडंट व मॅजिस्ट्रेट यानी असे ठरविले की जर आता जास्त कडक उपाय योजिले नाहीत तर बेसुमार रक्तपात होण्याचा प्रसंग येईल म्हणून लष्करी लोकाना एकदोन फैरी झाडण्यास हुकूम देण्यात आला. त्याबरोबर २ इसम तात्काळ ठार झाले व बाकीचे दंगेखोर पळाले. तेव्हा मग पोलिसानी अर्ध्या तासात राणीचा बाग मोकळा केला. टाऊन हॉलपर्यंत लष्करी पछारा ठेवण्यात आला व राणीच्या बागेभोवती गुरख्यांचे कडे वसविण्यात आले. दुसरा गोळीबार "इकडे चांदणी चौकात दंगेखोरांचा जोर अधिक आहे असे पो. सु. यास दिसून आले व टॉन-हॉलच्या दिशेला दोन गोळीबार झाल्याचेहि कानी पडल्या- वरून पो. सु. तिकडे गेले. त्या वेळी १५ सोल्जर व १५ पोलीस यांच्यावर सारखा दगडांचा मारा होत आहे आणि दंगेखोर राणीच्या बागेचे कठड्यावरून आत घुसत आहेत असे त्यास दिसून आले. हा प्रकार असाच चालू दिल्यास काही सोल्जर व पोलीस याना जबर जखमा होतील अशी भीति दिसून आल्या- वरून जमावावर गोळीबार करण्यास हुकूम देण्यात आला. गोळीबाराच्या दोनतीन फैरी झडल्या. तीन असामी पटकन प्राणास मुकले आणि इतरानाहि जखमा झाल्या असाव्यात. या योगाने दंगा मोडला व दंगेखोरांची पांगापांग झाली. आठ इसम मयत असून १२/१३ दवाखान्यात घायाळ आहेत. मेलेल्या इसमात लहान मुलगे कोणीच नाहीत. मशीनगन चढविलेली मोटारगाडी रस्त्यातून हिंडविण्यात आली. पण मशीनगनचा उपयोग कर- ण्यात आला नाही. त्याचप्रमाणे लष्करी स्वाराची तुकडी मागविली होती. पण दंगेखोरांची वाताहत झाल्यावर मग ती येऊन दाखल झाली. दंगा मोडण्यात लष्कर व पोलीस यानी मोठे आत्मसंयमन केले आणि पो. सु. व अॅ. डि. मॅजि- स्ट्रेट यानी अकस्मात उद्भवलेला वेडावाकडा प्रसंग मोठ्या धैर्याने पार पाडला असे स्थानिक अधिकाऱ्यांचे मत आहे !"