पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/४४०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

लो० टिळकांचे चरित्र (३) सत्याग्रहाची हकीगत [ कैसरी ता० ८ एप्रिल १९१९ तील उतारा ] भाग ६ रौलेटबिलाविरुद्ध सत्याग्रह्मताच्या द्वारा जाहीर निषेध करण्याचा विचार इतर अनेक ठिकाणाप्रमाणेच दिल्ली शहरातहि ठरला होता. त्याप्रमाणे रविवार ता. ३० मार्च हा दिवस दिल्ली शहरातील हिंदुमुसलमानानी सत्याग्रहृदिन म्हणून पाळला. परंतु समारंभ निर्विघ्नपणे तडीस न जाता लष्करी लोकाकडून निःशस्त्र लोकावर गोळ्या झाडण्यात आल्या आणि जागच्या जागी सहा इसम ठार झाले २ इसम इस्पितळात मरण पावले आणि १२ असामी जखमी होऊन इस्पि- तळात पडले. याखेरीज बरेच जखमी इसम इस्पितळात न जाता घरी किंवा खाजगी दवाखान्यात गेले असावेत पण त्यांची संख्या कळली नाही. हा जो शोचनीय प्रकार घडून आला त्याचे कारण काय व त्याला जबाबदार कोण याविषयी भिन्न भिन्न हकीकती प्रसिद्ध होत होत्या. परंतु सरकारी रीत्या सिमल्या- हून ता. ३ रोजी जी हकीकत जाहीर झाली ती काय सांगते ते पहा. "रौलेट - बिलाविरुद्ध निषेधप्रदर्शनार्थं रविवार ता. ३० रोजी दिल्ली शहरा- तील बहुतेक दुकाने बंद ठेवण्यात आली. ज्या कोणी आपली दुकाने उघडली होती त्यानाहि ती लवकरच बंद करावी लागली. दहा वाजल्यानंतर टांग्यांचीहि रहदारी बंद करण्याचा प्रयत्न होऊन उतारूना पायी चालावे लागले. या सर्व गोष्टीकडे पोलिसचे लक्ष होते आणि पोलिसची सर्वत्र जय्यत तयारी होती. दौड वाजण्याच्या सुमारास सत्याग्रह्यांचा मोठा जमाव स्टेशनाजवळ दाखल झाला आणि त्यातले काही इसम स्टेशनात जाऊन त्यानी तेथील फराळाच्या दुकानदारास आपले दुकान बंद करण्यास सांगितले व त्याने ते नाकारताच दुकानदारावर हल्ला करण्यात आला. तेव्हा रेल्वे पोलिसानी हल्ला करणान्या दोघा इसमास पकडून अटकेत ठेवले. हे वर्तमान कळताच बाहेरच्या जमावापैकी शेकडो लोक स्टेश- नात घुसले आणि त्यानी अटकेत सापडलेल्या दोघा इसमास सोडविण्याचा यत्न केला आणि स्टेशनावरील सर्व व्यवहार बंद होण्याची धास्ती वाटू लागली. त्या वेळी प्लॅटफॉर्मवर असलेले काही युरोपियन सोल्जर व मेसापोटेमियाहून येऊन मणी- पुरीला जाण्याकरिता रेल्वेत बसलेले २५० गुरखे शिपाई यांच्या साहाय्याने स्टेश- नचे रक्षण करण्यात आले. परंतु जास्त मदतीची अपेक्षा वाटून किल्ल्यातून लष्कर बोलावण्यात आले. त्यास अनुसरून सुमारे २० ते ३० ब्रिटिश सोल्जरांची एक तुकडी स्टेशनवर येऊन दाखल झाली. नंतर २ वाजता काही घोडेस्वारांसह पोलीससुपरिंटेंडेंट- चीहि स्वारी येऊन दाखल झाली. त्या वेळी स्टेशनवरील पायउतारा पोलिस व त्यांच्या मदतीस आलेले २० ते ३० सोजोर यांच्याभोवती जमावाचा पूर्ण गराडा पडला होता. लष्करचे व पोलिसचे लोक स्टेशनच्या दारांचा बंदोबस्त राखीत