पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/४३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

३२ लो० टिळकांचे चरित्र भाग १ सर्व्हेट ऑफ इंडिया सोसायटीचे अध्यक्ष ना. शास्त्री यानी कोइमतूर येतील एका व्याख्यानात सागितले की हिंदी लोक स्वराज्याला अपात्र आहेत असा भ्रम आपल्या- तीलच काही लोक माजवितात. अर्थात् हा टोला प्रतिनिविष्ट नेमस्ताना होता. सर कृष्ण गोविंद गुप्त व सर विलियम वेडरबर्न यानीहि याच वेळी उभयताच्या सहीनें एक लेख प्रसिद्ध करून युद्धानंतर काय सुधारणा मागाव्या या विषयी सूचना केल्या होत्या. अशा रीतीने मुंबईकर नेमस्ताच्या भोंवती हळुहळु चौफेर वेढा पडत चाळला. यामुळे मुंबईस भरणाऱ्या काँग्रेसचा रंग कसा काय खुलतो हे पाहण्याकडे सर्वांचे डोळे लागले. सर फेरोजशहा मेथा पण या सुमारास त्या सभेवर एक संकट आलें तें म्हणजे सर फेरोजशहा मेथा यांचा मृत्यु हे हाये. सर फेरोजशाहा यांचे थोडक्यात वर्णन करावयाचे तर आम्ही असें म्हणू कीं त्यांच्या इतका दणदणीत पुढारी मुंबई शहराला आजवर लाभला नव्हता. त्यांचें वय मरणसमयीं सुमारे सत्तर वर्षांचे होतें. पण त्यापूर्वी सतत चाळीस पंचेचाळीस वर्षे त्यानी देशसेवा केली होती. त्यांचा जन्म १८४५ साली झाला. मेथा यानी विद्यार्थी देत दाखविलेली बुद्धिमत्ता पाहून सर अलेक्झांडर अँट हे त्यांच्यावर खुष झाले आणि त्यानी याना विलायतेस जाण्याला मदत केली. १८६८साली मेथा हे बरि- स्टर होऊन परत आले, विलायतेत असताच त्यानी काही निबंध लिहून काही व्याख्याने देऊन आपल्या कामगिरीला सुरवात केली होती व तेंच काम त्यानी इकडेहि सुरू केलें. प्रारंभीच काही खटल्यात त्याना चांगले यश आल्यामुळे बॅरिस्टर म्हणून त्यांची चांगली प्रसिद्धी झाली आणि कोल्हापूर प्रकरणात आगरकर व टिळक यांच्यातर्फे त्यानाच वकीलपत्र देण्यात आले होते. वकिलीच्या धंद्यात पुढे त्याना गुजराथ काठेवाडमधील संस्थानिकांचा आश्रय लाभला आणि पैसेहि भरपूर मिळू लागले. यामुळे आणि जात्या थोडेसे आळशी असल्यामुळे हळू हळू ते मिजाशी बनले. पण काही नियमित वेष्ठ सार्वजनिक कार्याकडे देण्याची पद्धति त्यानी चालू ठेवल्यामुळे ते केव्हाही पुढारीपणात मागे पडले नाहीत. लॉर्ड रिपन यांच्या कारकीर्दीत स्थानिक स्वराज्याची प्रगति झाली तेव्हा बदरुद्दिन तय्यबजी व तेलंग यांच्याबरोबर त्या प्रगतीची लाट उचलून धरण्याला त्यानी बरीच खटपट केली. पण ही नुसती वरची खटपट नसून मेथा याना स्थानिक स्वराज्याची खरी आवड होती यामुळे ते मुंबई म्युनिसिपालिटीत लवकरच शिरले आणि तेथील धुरीणत्व त्यानी आजन्म आपणाकडे टिकविले. नावाचा अध्यक्ष कोणीहि असो पण केव्हा विरोधी चळवळीची तर केव्हा अधिकाऱ्यानी उपस्थित केलेल्या योजनेची सूत्रे त्यांच्या हाती येत असत. शिवाय त्यांच्या अंगी एककल्लीपणा नसल्याने त्यांचे सहाय्य आपणास मिळावे असे सर्व पक्षाना वाटे आणि ते तारतम्य पाहून तें सहाय्य देतहि. १९०६ साली म्युनिसिपालिटीतील काही सभासदानी त्यांच्या वतनदारीविरुद्ध मोठा