पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/४३८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

लो० टिळकांचे चरित्र भाग ६ लोकांचे बळी पडले असतील. आमच्यातले विष आम्हालाच बाधले. बरे चार खाती सोपीव करून दिल्याने युरोपियन लोकांचे असे काय नुकसान झाले ? पण यानी एकंदर बहाणा असा केला की आता या देशात राहण्याची सोय राहिलेली नाही. राहावयाचेच तर पक्की जामीनकी सरकाराकडून मागून घ्यावी. राज्यकार- भारात ही जामिनकी ठळक शब्दानी लिहून ठिकठिकाणी चिकटविलेलीच होती. बरे देशात अत्याचार होऊ नयेत अशाविषयी हा कायदा काय करणार होता ? कारण बंगाल्यात किंवा इतर कोठे जे अत्याचार म्हणून होत असतील ते गोऱ्या लोकाविरुद्ध नसून कोठे एखाद्या व्यक्तीचा खून कोठे दरोडे असली कृत्ये घडत होती पण त्यांचा राजकारणाशी संबंध येत नव्हता. तात्पर्य रौलेट त्रिले ही निष्कारण होती. मात्र त्यांचा इतर रीतीने उपद्रव फार झाला. (२) गांधी व सत्याग्रहाची चळवळ कौंसिलातील प्रतिकार यशस्वी होत नाही असे दिसून येताच गांधीनी या विलाविरुद्ध सत्याग्रहाची चळवळ करण्याचे योजिले. त्यानी सत्याग्रहाच्या शप- थेचा एक नमुना तयार केला. त्यात असा मजकूर होता की " सदर बिलानी स्वातंत्र्य न्याय वगैरे तत्त्वाना आणि तदनुषंगिक जन्मसिद्ध हक्काना बाध येतो अशी आमची प्रामाणिक समजूत असल्यामुळे या बिलांचा उद्या कायदा झाला तर तो, किंवा आम्हाला योग्य सल्ला मिळेल त्याप्रमाणे इतर काही कायदेहि, आम्ही मोडूं. मात्र या झगड्यात सत्य सोडणार नाही आणि कोणाच्या जीवि ताला किंवा मालमत्तेला धक्का लागेल अशी गोष्ट आम्ही करणार नाही. " बिले मंजूर झाली व त्याबरोबर सत्याग्रहाची मोहीम सुरू झाली. एप्रिल महिन्याचा दुसरा आठवडा हा एकंदरीने हिंदुस्थानच्या इतिहासात नमूद करून ठेवण्या- सारखा झाला. सर्वच प्रांतात एकदम उचल झाली. पण मुंबई व पंजाब प्रांतात ती विशेष झाली. हरताळ पडले. सभातून कडक भाषणे झाली. आणि याच्याहि पुढले प्रकार उभयपक्षी झाले. ता. ३० मार्च हा दिवस दिल्ली येथील हरताळाचा होता. हिंदुमुसलमानांची एकी होती. लोकानी शांततेचा भंग केलेला नव्हता. असे असता पोलिसानी गोळीबार केला व त्याला अगदी थोडे निमित्त घेतले. पण एकदा गोळीबार सुरू झाल्यावर दंगल झाली व आता दिल्लीचे काय होते असे वाटू लागले. एके ठिकाणची जाहीर सभा आटपून स्वामी श्रद्धानंद हे परत चालले होते तो पोलिसानी रस्ते रोखले. तेव्हा त्याच्या कारणाची पुसतपास करण्याकरिता स्वामीजी पुढे झाले तों त्यांच्यावर शिपायानी बंदुका रोखल्या. तेव्हा स्वामीजी म्हणाले " हा मी उभा आहे. तुम्हाला गोळी घालावयाची असेल तर घाला. दंग्यात अनेक लोक मारले गेले व अनेक जखमी झाले. 33 दिल्लीकडील बातमी ऐकून गांधीनी प्रेस अॅक्ट मोडण्याकरिता शिळा- छापावर 'सत्याग्रह' नावाचे वर्तमानपत्र काढले, ते केवळ कायदा आपल्यावर ओढून