पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/४३७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग ६ रौलेट अॅक्ट होतील तितकी पुढे ढकलली जावी निदान त्यांच्या शेकडो अपायकारक अंगा- पैकी होतील तितकी तरी कमी करावी असा निश्चय होता. यामुळे कौन्सिल - सारख्या ठिकाणी वादयुद्धाचे जितके प्रकार शक्य तितके घडले. सुदैवाने वाच्छा पटेल सप्रू सुरेंद्रनाथ शास्त्री खापर्डे मदनमोहन कामिनीकुमार चंदा या सर्वांचे एकमत होते. तथापि सरकारच्या बाजूला निश्चित बहुमत असल्यामुळे काही उप- योग झाला नाही. शेवटच्या दिवशी तर रात्रीहि सभा बराच वेळ चालली. अशा रीतीने पुढील अनेक चळवळीना दंग्याधोप्याना व अनर्थाना विनाकारण जन्म देणारी ही बिले लोकावर लादली गेली! खरोखर पाहता या बिलांचा प्रत्यक्ष उपयोग सरकारला वन्चितन्त्र करावा लागला. नव्या सुधारणांचा अंमल सुरू झाल्यापासून जी क्रांतिकारक चळवळ देशात पूर्वी होती ती बहुतेक हटली असे म्हणण्यास हरकत नाही. मग मन्वन्तरपद्धतीप्रमाणे एक मनु संपला व दुसरा आला असे म्हणा किंवा सुधारणानी विचारांची एक नवीन दिशा उघडली असे म्हणा. कसेही असले तरी आठ दहा वर्षांपूर्वी जी क्रांतिकारक व गुप्त चळवळ देशात होती ती यावेळी नाहीशी झाली होती ही गोष्ट खचित. या बिलांचा अंमल सरकारास बहुतेक केव्हाच करावा लागला नाही. पण वांझोटीचाच अधिक उप- द्रव म्हणतात त्याप्रमाणे या बिलानी अवांतर पीडा देशाला फार दिली. बिलाचा प्रत्यक्ष उपयोग पडला नाही तरी सरकार खातेनाकी अगदीच पूज्य होऊ नये इतकी काळजी घेत असे. दुकानदारांची ही पद्धतच आहे की खात्याची बाकी कोणी सगळी देण्याला आला तरी ती न घेता मुद्दाम एखादा रुपया त्याचे नावे शिल्लक ठेवावयाचा किंवा व्यवहाराला मंगल प्रारंभ व्हावा म्हणून लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आवडत्या गिन्हाईकांच्या पदरी थोडा तरी माल घालावयाचा व तसे हि नसले तर अनासुंदी दुबेरजी करावयाची. गेल्या आठ वर्षातील रौलेट बिलाची खाती तपासून पाहिली तर असाच अनुभव येईल. पण डिफेन्स ऑफ इंडिया अॅक्टाच्या धर्तीवर काही कायद्याचे शस्त्र हाती पाहिजे म्हणूनच सरकारने ही विले पुढे आणली. रौलेट कमिटीने संशोधनाचा एवढा कापूस पिंजला आणि अत्याचारी प्रवृत्तीचा ढीग रचला तेव्हा त्यातून एक दोन सुतेहि कातून काढता आली नाहीत तर सर्व श्रम व्यर्थ ! अँग्लो इंडियन लोक सिव्हिल सर्व्हेट इंग्रज व्यापारी सर्वांनी असा गिल्ला चालविला की सुधारणा येणार मग आता आम्ही जगावयाचे कसे ? पण खरोखर याना मरावयाला झाले होते काय ? अस्वल येण्यापूर्वीच आरोळी मारावी या न्यायाने त्यानी हाकाटी चालविली होती. बिचारे अस्वल येणार त्याला दात व नखे नाहीत ही गोष्ट कोणालाहि उघड दिसून येण्यासारखी होती. शिवाय त्याचे चारी पाय व नाकतोड याना बांधलेल्या दोया पार्लमेंटच्या हाती रहावयाच्या हेहि ठरलेले होते. मग या अस्वलाची भीति कसली ? पण भ्यालो असे दाखविण्याचा सर्व गोऱ्या रहिवाशानी कटच केला होता. अत्याचाराच्या एकंदर चळवळीत फार तर पांच चार गोऱ्या