पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/४३५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग ५ तहाचा उत्सव १०५ परिशिष्ट ६ तहाचा उत्सव ( बातमीपत्र ) ता. ३ जुलाई १९१९ लंडनचा या आठवड्यातील मुख्य विषय म्हटला म्हणजे तह. जर्मनी तहा- वर सही करणार ही गोष्ट निश्चितप्राय होती. तथापि अखेरपर्यंत काय होते काय नाही याविषयी इंग्रजाना धागधुग वाटे. शेवटी शनिवारी दुपारी सव्वातीन वाजता तहावर सह्या झाल्याची बातमी येथे साडेतीन वाजता प्रसिद्ध झाली. त्याबरोबर विजयोत्सव सुरू झाला. सरकारी बडा उत्सव अजून पुढे व्हावयाचाच आहे. पण लोकानी छोटा उत्सव ताबडतोब उरकून घेतला. शहरवा मुख्य चव्हाटा ट्राफलगार स्केअर या ठिकाणी हजारो रिकामटेकडे लोक पॅरिसहून बातमी येण्याची वाट पहात आगाऊच बसले होते. त्यातच दुकाने कचेऱ्या बंद होऊन बाहेर पडलेल्या लोकांची भर पडली. गाड्या व मोटारी यांची वाहतुक अशक्यच झाली. चोहोकडे तोफांचे प्रचंड आवाज व त्यातच फटाक्यांचे बार होऊ लागले. वर आकाशात विमाने घारीसारखी फिरू लागली. लहान मोठी निशाणे डोक्यातील टोप्यांपासून तो उंच इमारतीच्या शिखरापर्यंत लागली. इतर सर्व बाजार बंद पडून निशाणांची खरेदी-विक्री हाच मुख्य व्यापार होऊन बसला. भररस्त्यावर स्त्रीपुरुष उड्या मारू लागले. एखाद्या जत्रेतल्याप्रमाणे नाच गाणे बजावणे खेळ तमाशे मद्यपान व भामटेगिरी याना ऊत आला. हौशी लोकांच्या थव्यानी राजवाडा वेढून गेला व राजाराणी सज्जात येऊन लोकाना दर्शन देऊ लागली. रात्री अनेक विमानानी हजारो फुटावरून लखलखीत दीप- किरण पाडून राजवाडा पुष्कळ वेळ पाजळून धरला होता. इंग्लंडच्या ऐहिक वैभ- वाचा कळस झाला असे चर्चिल साहेबानी नुकतेच बोलून दाखविले ते खरेच आहे ! जगातल्या सांधीकोपऱ्यात लक्ष्मी अजून दडून बसली असेल तिला तेथून खेचून आपल्या देशात आणण्यास या विजयाने इंग्रजाना मार्ग मोकळा झाला. हिंदुस्थानच्या वतीने बिकानेरच्या महाराजानी तहावर सही करून या बोडणात हात ओला करून घेतला. पण हिंददेवीच्या कपाळावर स्वराज्याचा टिळा मात्र आताच लागण्याचे चिन्ह दिसत नाही ! बारशाच्या समारंभात वांझोटीकडे पाळण्याला चार झोके देण्याचे काम येणे यात फारसे औचित्य नाही. पण श्रीमं- तांच्या घरचे सोन्याचे जड पाळणे हालवायला गरीब शेजारणीहि उपयोगी पड तात ! त्याना चोळीचा एक खण दिला म्हणजे पुरतो !