पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/४३४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१०४ लो० टिळकांचे चरित्र भाग ५ मिळून एक बायको पार्लमेंटची सभासद म्हणून निवडलीहि गेली ! बायकाना मतदारीचा हक्क मिळेना पण त्यापूर्वी सर्व प्रकारच्या कचेन्यातून बायका पुरुषा- प्रमाणे कामधाम करीत होत्या ! पार्लमेंटात राजाला काहीएक अधिकार उरलेला नाही. व 'गॉड सेव्ह धि किंग' हे (राजस्तोत्र) गाइले जात असता एखादा पार्ल- मेंटचा सभासद खुशाल बसला तरी त्याचे कोणास काही करिता येत नाही. पण सर्व कारभार राजाच्या नावानेच चालला पाहिजे ! तहाची बातमी शिळी होऊन तत्संबंधी केलेल्या मद्यप्राशनाच्या धुंदीतून लोक शुद्धीवर येऊन कामालाहि लागल्यावर मग काही दिवसानी जुन्या पद्धतीप्रमाणे राजाच्या तुतारीवाल्यांनी मोठ्या लवाजम्यानिशी मिरवणूक काढून शहरात चारच वाट्यावर तहाचा जाहिरनामा वाचून दाखवावाच लागतो तसा दाखविला. जुने लंडन शहर व नवे लंडन शहर यांच्यातला भेद लोपून शेकडो वर्षे झाली तरी अजून या दोहोंच्या दरम्यान काल्पनिक सीमेवर राजदूतानी उभे राहून पलीकडे दहा हातावर उभा राहिलेल्या लॉर्ड मेयरला तुतारी वाजवून आपल्या आगमनाची वर्दी दिली पाहिजे ! त्यानी 'कोण' म्हणून विचारिलेपाहिजे. यानी आम्ही राजदूत म्हणून सांगितले पाहिजे. मग जुन्या काळचे वेशी उघडण्याचे नाटक करण्याकरिता रस्त्यावर आडवा लावलेला रेशमाचा दोरा तोडला पाहिजे. व मग राजदूतानी आत प्रवेश केला पाहिजे ! पार्लमेंटात सभासदाच्या नावाने निर्देश करावयाचा नाही तर त्याची निवडणूक करून दिलेल्या गावाच्या किंवा पेठेच्या नावाने करावयाचा ! वडील राजपुत्राला परवा बॅरिस्टर करून घेण्यात आले. श्रीमंताच्या मुलांचा अभ्यास त्यांच्या शिक्षकानी घोकला तरी चालतो. त्याचप्रमाणे त्यांच्या परीक्षाहि अभ्यास केल्या- शिवाय उतरतात हे ठीकच आहे. पण राजपुत्राला तो 'बडे बापका बेटा ' म्हणून जर बॅरिस्टर करून घेता येते तर त्याजकडून नेहमीच्या सरनाम्यातील तपशील भरून घेण्याचे का वगळता येऊ नये ? ज्याला परीक्षा माफ त्याला प्रतिज्ञालेख का माफ होऊ नये ? पण नाही. त्यात जुना नमुना बरोबर वठला पाहिजे. मौज ही की त्याप्रमाणे सरनामा ( declaration ) भरून देताना राज- पुत्राला आपल्या हाताने खालील गोष्टी लिहून द्याव्या लागल्या. प्र. - ' तुझ्या बापाचा धंदा कोणता ? उ. - ' माझ्या बापाचा सांगण्यासारखा धंदा नाही. तूं स्वतः काय करीत असतोस ' ? उ. - ' मी बेकार निरुद्योगी आहे! ' सारांश, इतका पुराणमतवादीपणा इतर देशात क्वचितच आढळेल. आणि हे इंग्लिश लोक हिंदी लोकाना जुन्या मताच्या अभिमानाबद्दल हसणार ! प्र. 3