पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/४३१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग ५ इंग्लंडातला एक संप १०१ स्थानच्या जखमेत मीठ भरले. पण याची लाज इंग्लंडला कोठे आहे ? असेल तर हिंदुस्थानास स्वराज्य दिल्याशिवाय इंग्लंड एक दिवसभरहि राहणार नाही. असो. अशा अंतर्बाह्य विश्रम स्थितीत विश्वबंधुत्वाचा उपदेश कुणाला करता ? या परिषदेस जमलेल्या काही लोकाना हे म्हणणे पटण्यासारखे आहे पण त्यांचे ऐकणार कोण ? या विश्वबंधूंच्या मेंढ्यांच्या कळपात काही लांडगेहि होते. मंगळवारच्या सभेत सर हॅरी जॉन्स्टन यानी 'विश्वबंधुत्व व देशोदेशीचे नेटिव्ह लोक' या विषयावर निबंध वाचला. त्यात त्यानी धडधडीत असे विधान केले की काळ्या लोकांची सुधारणा गोन्यानी करून त्याना उच्च पदाला पोचविले त्याअर्थी त्यांच्या दरम्यानचा आजचा संबंध अर्थात् वरिष्ठ कनिष्ठ भावाचा पुढेहि असाच राहिला पाहिजे. या विधानाचा श्रोतृवर्गापैकी एका न्यायप्रिय गोऱ्या मनुष्यानेच निषेध केला. पण आमच्या पालबाबूंनीहि जागच्या जागी जॉन्स्टनसाहेबाना खग- खणीत उत्तर दिले. हे उत्तर श्रोतृवंदाला इतके आवडले की त्यानी अनेक वेळा टाळ्यांचा गजर केला व पाळवायूंचे भाषण संपल्यावर पांचपंचवीस स्त्रीपुरुषानी त्यांच्याशी हस्तांदोलन करून त्यांचे अभिनंदन केले. परिशिष्ट ४ इंग्लंडातला एक संप ( बातमीपत्र ) २ आक्टोबर १९१९ नाटकात ट्रान्सफर सीन करतात त्याप्रमाणे हा संपाचा घाला अचानक पडला. शुक्रवारी सकाळी संप होणार अशी बातमी पत्रातून वाचली व रात्री संप सुरू झाला. याच्याहि आधी एक दिवस गुप्त खलबते चालू होती म्हणतात. पण सरकार व रेलवेचे लोक यांच्या दरम्यानच्या भांडणाचा कडेलोट निर्वाणीचा खलिता व युद्धाचा पुकारा ही सर्व चोवीस तासात घडून आली ! रात्री दहा व बारा यांच्या दरम्यान रेलवेचे लोक आपल्या कामात शिथिलता करू लागले व बाराच्या ठोक्यास सर्व इंग्लंड व स्काटलंडभर रेलवेकामदार काम टाकून घरोघर चालते झाले. स्टेशनास कुलपे पडली. शनिवारी सकाळी ट्रॅम व बस सुरू होत्या त्यावरच कामकाजास जाणाऱ्या सर्व लोकांची धाड पडली. शेकडो लोकांच्या रांगा या वाहनांची वाट पहात तास-तास उभ्या होत्या. रात्रीच्या सुमारास ही गर्दी थोडी कमी झाली. कारण अगदी जरूरीच्या कामाशिवाय बाहेर पडून मैल- मैल विनाकारण चालत येण्याचे साहस कोण करणार १ शनिवार व रविवार दोनहि दिवस जवळ जवळ बिनकामकाजाचे असल्यामुळे कसे तरी भागले. पण फिरून सोमवारपासून दंगल उडाली. लंडनच्या आसपास पन्नाससाठ मैलापासून