पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/४३२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१०२ लो० टिळकांचे चरित्र भाग ५ रोज शहरात कामकाजास येणारे धंदेवाले अनेक आहेत त्यांचे तर खाडेच पडले. पण खुद्द शहरची वस्ती या टोकापासून त्या टोकापर्यंत सुमारे बावीस पंचवीस मैल चौफेर पसरलेली आहे यामुळे शहरात राहणाऱ्या लोकांचीहि जवळ जवळ तीच स्थिति झाली. विजेच्या चमकेप्रमाणे झालेला हा संप विजेच्या चमकेप्रमाणे संपेल ही आशा नष्ट होताच सरकार व लोक आपापली सोय करण्याच्या मार्गास लागले. त्यांतल्यात्यात लोकापेक्षाहि सरकारवर वाहनांची सोय करून देण्याची जबाबदारी अधिक यामुळे सरकारने जाहीरनामा काढून लोकास धीर दिला व आपली सर्व साधने सज्ज केली. पहिली तयारी सैन्य आणण्याची. कारण दंग्याधोप्यास सुरवात होते की काय ही भीति. पण संपवाल्यांचे पुढारी शहाणे आहेत. त्यानी संपवाल्यास थोप- वून धरले. संपवाल्याना त्यांच्या फंडातून रोज थोडेबहुत पोटास मिळण्यासारखे असल्यामुळे बाजाररहाट एकदम लुटले जाण्याचे कारण नव्हते. संपवाल्यांची संख्या पांचलक्ष पण ती सर्व देशभर पसरलेली. यामुळे सैन्यास दंगेधोपे मोड- ण्याचे नसले तरी आगगाड्या चालू करण्याचे काम होतेच. पण त्याहिपेक्षा लोकास अन्न भाजीपाला दूध पुरविण्याचे काम अधिक महत्त्वाचे होते. जेथे शे- पन्नास आगगाड्या दिवसात सुटावयाच्या तेथून सैनिकांच्या मदतीने दहापाच तरी बया असे मानून लष्करी अधिकारी अस्तन्या सारून इंजिनड्रायव्हर व फायरमन बनले. सरकारी तबेल्यातल्या सर्व मोटारगाड्या बाहेर निघाल्या. हाईड पार्कात लोकाना मज्जाव करून हजारो मोटारगाड्या तेथे जमविण्यात आल्या. व ज्या स्टेशनावरून धान्य अन्न दूध वगैरे रोज गावात यावयाचे तेथून ते आणून गावात घाऊक व्यापाऱ्यांच्या घरी पोचविण्याचे काम सुरू झाले. शिवाय हे काम पुरे पडावे म्हणून युद्धाच्या दिवसाप्रमाणे संप चालू असेपर्यंत तिकिटाशिवाय कोणास काही पदार्थ मिळू नये व मिळावयाचा तोही फारच माफक मिळावा, एक आठवड्यापेक्षा अधिक कोणीहि आपल्याजवळ शिधा ठेऊ नये, असे हुकूम सुटले. दिवाबत्ती कोळसा ग्यास जरूरीपुरतीच वापरावी, कामांपेक्षा अधिक तारा करू नये पत्रे पाठवू नये, असा इशारा देण्यात आला. सर्व सरकारी नोक- रांची रजा रद्द करण्यात येऊन वाहतुकीच्या कामास उपयोगी पडणारे स्वयंसेव- कांचे पथक उभारण्यात आले. आरमाराच्या नोकरपेशाची जहाजे टेम्सनदीमध्ये आणून नांगरली. सर्व सरकारी व खासगी विमाने कामगिरीस धरून तीं टपाल ब पार्सले नेण्याकरिता व क्वचित् उतारू वगैरेच्या उपयोगाकरिता संचारार्थ योज- ण्यात आली. कारण सरकारला हरप्रयत्नाने संप मोडावयाचा होता. खासगी लोकानीहि आपल्या साधनांची शिकस्त केली. मात्र ती संप मोडण्याच्या हेतूने नव्हे तर स्वतःच्या सोईकरिता. लोकास खरोखर एकीकडे आड व एकीकडे विहीर असे झाले. मनातून संपवाल्याशी सहानुभूति. पण संप सिद्धीस जावा म्हणून स्वतःची गैरसोय कोण किती सोसणार? बरे, संपवाल्यांचीहि