पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/४३०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१०० लौ० टिळकांचे चरित्र " भाग ५ आइसक्रीम खात असल्याप्रमाणे मला अंतर्बाह्य शीतळता मंडपात बसून वाटली! मी इंग्रजांचा भाऊ इंग्रज माझे भाऊ. आता कसले साम्राज्य आणि कसला होमरूल ! खुद्द लंडन हेंच पुणे झाले ! ' हैं विश्वचि माझे घर' असे म्हणून टाळ्याहि पिटल्या असत्या. पण असली समाधी निमिषमात्रच टिकणार ! तथापि हा सर्वस्वी माझाच दोष होता असे म्हणवत नाही. विश्वबंधूच्या या मेळ्यात सर्वच भोंदू होते असे मी म्हणेन तर तो अन्याय होईल. काही खास सच्चे होते. पण सूर्यप्रकाशाप्रमाणे तिन्हाइतास स्पष्ट दिसणाऱ्या काही गोष्टी याना दिसत नव्हत्या याचे नवल वाटले. विश्वबंधुत्वाची इमारत बांधावयाची. पण यांचा विचार ती खिस्ती धर्माच्या पायावर बांधावयाची. ख्रिस्ती धर्माचे अनुयायी नसणारे लोक जर या परिषदेस सभासद म्हणून जाऊ शकतात तर दुसऱ्या ईश्वराचे नावाने प्रार्थनादि का होऊ नयेत ? त्यात ख्रिस्ताचे नावच कशाला ? बरे तुमचा खाइस्ट तर आमचाहि राम काढून तेथे त्याच्या नावाने प्रार्थना करा म्हटले असते किंवा आमची आम्ही केली असती तर ते मात्र चालले नसते ! ' खिस्ती विश्वबंधुत्व' हा शब्दप्रयोग ' ब्राह्मणांचा जगद्गुरु' या शब्दप्रयोगा- प्रमाणेच अतिव्यासिदुष्ट नव्हे काय ? पण हा भोळसरपणा नुसत्या धर्मकल्पनेपुर- ताच नव्हता. विश्वबंधुत्वाच्या या गोमुखीला आतून साम्राज्यमूलक स्वार्थपरायण- तेचे खूप जाड अस्तर लावले होते. या विश्वबंधुपरिषदेचा हेतु राष्ट्रसंघाला मदत कर- ण्याचा आहे. राष्ट्रसंघाच्या हातून जगाची शांतता कितपत राहणार हे दिसतच आहे. पण राष्ट्रसंघाच्या अंतर्व्यवस्थेत जो धडधतीत अन्याय दिसून येतो तोहि या मायावी लोकांच्या नजरेस पडत नाही असा बहाणा ! राष्ट्रसंघाच्या रचनेत इंग्लं डला प्रमुख मान पाहिजे तो न मिळेल तर कुणा लेकाला हवा राष्ट्रसंघ ? युरो- पातल्या टीचभर परक्या राष्ट्रांच्या हक्कांचे रक्षण करण्यास हा राष्ट्रसंघ निर्माण झाला. पण याच्या अवतारकृत्यात आजची सामाज्ये मात्र कायमच राहणार ! जर्मनी ऑस्ट्रिया तुर्कस्थान व रशिया यांचे साम्राज्य मोडले तर ते चालेल. पण इंग्रजांचे साम्राज्य मात्र अबाधित राहिले पाहिजे, एवढेच नव्हे तर त्यातल्या प्रचंड पुराण राष्ट्रानी स्वराज्य मागितले तर त्यांचा न्याय मात्र करण्यास या राष्ट्र- संघास अधिकार नाही ! आमचे आम्हीच पाहून घेऊ आणि दुसऱ्याचेहि आम्ही पाहू. हा न्याय ! 'तुम्ही आम्ही भाऊभाऊ पण तुमचे-आमचे आम्हीच खाऊ !' ही बंधुप्रेमदर्शनाची उत्सुकता हिंदी लोकाप्रमाणेच जगातील इतर अनेकाना हास्यास्पद वाटली तर त्यात त्यांचा काय दोष ? आपल्या बुडाखालचे तर संभाळायचेच पण दुसन्याचेहि साधल्यास हाताखाली घालावयाचे. या भोळेपणास भाळणारा कोण असेल तो असो ! राष्ट्रसंघात एक मत अधिक मिळावे म्हणून वसाहतीबरोबर हिंदुस्थानास इंग्लंडने आपल्याबरोबर घेतले. अमेरिकेने हे ओळखून या कावेबा- जपणाला हरकत घेतलीच. पण ज्याला आपल्या घरी स्वराज्याचा मान नाही त्याला आमच्या बरोबरीला आम्ही बसवून कां घेऊ ? असे उघड म्हणून तिने हिंदु-