पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/४२९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग ५ ब्रिटिश साम्राज्य व विश्वबंधुत्व ९९ घालण्यात गेला आहे. त्यांचे अध्यक्ष या नात्याने भाषण ऐकून कोणाच्याहि मनात सत्स्फूर्ति झाल्याशिवाय रहाणार नाही. पण दैव असे लबाड की त्याने या विश्वबंधुत्वाच्या परिषदेत लॉइड जार्जसारखे पाताळयंत्री राजकीय मुत्सद्दीहि आणवून परिषदेचे मातेरे केले ! या परिषदेस अनेक देशांचे लोक आले होते पण त्यातल्या त्यात बहुतेक साम्राज्यातलेच होते. आमच्या राष्ट्रीय सभेतर्फे डेप्युटे- शनची मंडळी या परिषदेस प्रतिनिधि म्हणून गेली होती. प्रार्थना व्याख्याने धर्मोपदेश चर्चा या सर्वाना आम्ही मधून मधून हजर होतो. सोमवारी लंडनच्या लॉर्ड मेयरने सर्व प्रतिनिधीना आपल्या इतिहासप्रसिद्ध ग्रासादात (मॅन्शन हाऊस) चहास बोलावून सत्कार केला. मि. स्पेंडर लॉर्ड रॉबर्ट सेसील वगैरेंचे निबंध चांगले होते. मि. मैत्र नावाच्या एका बंगाली गृहस्थानेहि एक निबंध वाचला. बुधवारी सकाळी मुख्य प्रधान मि. लॉईड जॉर्ज यांचे भाषण झाले, आम्ही प्रतिनिधीत सामील अस- ल्याने आम्हास चार हातावरून हे भाषण ऐकावयास सापडले. लॉईड जॉर्ज यांचे वक्तृत्व दांडगे आहे पण त्यांच्या योग्यतेचे वक्ते हिंदुस्थानातहिं अनेक आहेत. त्यांचा आवाज मोठा व चांगला आहे पण वरचेवर टिपणाकडे पाहणे व चष्म्याच्या घालकाढीचा खेळ करणे यामुळे स्वारस्य जाते. त्यांचे हातवारे व नाटकी थाट हे पूर्वी शोभत असतील पण मुख्य प्रधानाच्या दर्जाच्या माणसास ते शोभत नाहीत. ही सभा उत्तमोत्तम लोकांची होती. पण खूप टाळ्या पिटणे वगैरे फाजील दिखाऊ प्रकार अशाहि सभामधून होतात हे दिसून आले. या परिषदेच्या निमित्ताने चार दिवस लंडन शहरात निदान त्याच्या एका लहानशा भागात बंधुप्रेमाचा पूर वहात होता. तो इतका की खऱ्या भाविक श्रोत्यास आपण कलियुगात नसून सत्ययुगात किंवा तत्पूर्वीच्या म्हणून वर्णन केलेल्या सुवर्णयुगात आहो असे वाटले असते. वर आकाशात एक बाप आणि खाली पृथ्वीवर सर्व भाऊबहिणी याशिवाय तिसरा पदार्थ नाही ! चार दिवस ईश्वराच्या प्रार्थनेचा एकसारखा मारा सुरू होता. कोणत्याहि कार्यक्रमाच्या आधी प्रार्थना मध्ये प्रार्थना व शेवटी प्रार्थना ! मधूनमधून सर्व सभा मुक्तकंठाने गीते गायी व हरदास "टाळी महाराज' म्हणतो त्याप्रमाणे उपदेशक उपदेशाचा कोरडा ओढी. जितका वेळ डोळे उघडून काम चालले होते तितकाच वेळ डोळे मिटून चालले असेल ! ज्या व्यासपीठावरून नुकतेच द्वेषाभीचे लोळ उठत होते त्यावरून आता विश्वप्रेमाच्या गुलाबपाण्याचे हजारे उडू लागले. ईश्वरस्तुतिरूपी गुलाबाच्या फुलांचा एक थर तर लगेच त्याच्यावर बंधुप्रेमाच्या खडीसाखरेचा एक थर असे पांचपंचवीस थर रचले जाऊन जणु काय सर्व जगाला खायला पुरण्याइतका मिठा स्वादिष्ट व औषधी गुलकंद बनत होता. मीहि एक वेळ डोळे मिटून अंतर्मुख होत्साता पाहू लागला तो पौर्णिमेच्या चांदण्यामध्ये स्फटिकाच्या टि० उ... ३१