पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/४२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग १ होमरूल लीगची स्थापना ३१ लागले. त्यामुळे ता. २७ सप्टेंबरच्या क्रॉनिकलमध्ये दादाभाई यानी पत्र पाठवून असे कळविले की 'मी लीगचा अध्यक्ष होण्याचे कबूल केले असे प्रसिद्ध झाले आहे ते काही गैरसमाजाने झाले असावे.' त्यावर बाईंनी दादाभाईना तार करून त्याच्या व आपल्या दरम्यान जे संभाषण झाले त्याची त्याना आठवण दिली. तेव्हां दादाभाईंनी न्यू इंडियाचा अंक वाचून फिरून क्रॉनिकलला पत्र लिहून कळविले की ' कांही शर्तीवर मी लीगचा अध्यक्ष होण्याचे कबूल केले ही गोष्ट खरी आहे.' अशा रीतीने बाईवरील आक्षेप उडून तो स्वतः दादाभाईवर आला. पण दादाभाईनी योग्य ती दुरुस्ती केली होती यामुळे त्यांच्याकडून क्रॉनिकलला पत्र लिहविणारांनी कांही तरी मध्येच गडबडगुंडा केला असावा हे अनुमान सहजच सिद्ध झाले. आणि नेमस्त लोक समेटाचा बिघाड करणार त्याप्रमाणे लीगच्या चळवळीलाहि विरोध करणार असे दिसून आले. नेमस्तांनी टिळकांवरचे शस्त्र आतां बाईचर धरले. कांही दिवसापूर्वी थिऑसफीच्या कारभारासंबंधी एक जाहीर वाद उपस्थित झाला होता. त्याचा उल्लेख करून 'बाई महत्त्वाकांक्षी आहेत चंचलबुद्धीच्या आहेत मनांत येईल ते एकदम करतात' असे अवांतर गैर- लागू आक्षेप घेण्यास त्यानी सुरवात केली. तसेच मुंबईच्या गुजराथी पत्राने असा प्रश्न उपस्थित केला की काँग्रेस व होमरूल लीग यांचे संबंध वेळीच न ठरविले तर पुढे घोटाळा होईल. ही सगळी दिशाभूल होती. पण सर्वच प्रांतांतील नेम- स्तांना हे प्रश्न सुचले नाहीत. बाई कलकत्त्यास गेल्या तेव्हां त्यांनी 'होमरूल लीग' या विषयावरच भूपेंद्र बाबू यांच्या अध्यक्षतेखाली व्याख्यान दिले. अला- हाबादचा 'लीडर' ' अभ्युदय' लखनौचा ' अॅडव्होकेट' नागपूरचा ' हित- वाद' इत्यादि नेमस्त पत्रानीहि होमरूल लीगच्या तत्त्वांचे समर्थन केले. बाई कलकत्त्याहून परत येतांना मुंबईस उतरल्या तेव्हां त्यानी असे सांगितले की एका मुंबई शहराखेरीज बाकीच्या ठिकाणी हा वाद फारसा नाही. शिवाय त्यानी मुंब- ईस दादाभाईंना समक्ष भेटून दादाभाईची अध्यक्षपदाला पुनः संमति मिळविली. मद्रास कॉग्रेस कमिटीने तर लीग संबंधाने कांही सूचनाहि केल्या आणि मध्य- प्रांतांतील नेमस्तांनी तुमच्या लीगला आमची कांही हरकत नाहीं असें सांगितले. यानंतर राष्ट्रीय सभेच्या संघटनाला आणखी एका दिशेने मदत झाली. १९१५ सालची कॉंग्रेस मुंबईस सत्यप्रसन्न सिंह यांच्या अध्यक्षतेखाली भरण्याचे ठरले होते. त्यावेळी मस्लिमलीगची सभाहि मुंबईस भरवावी अशी कल्पना निघाली. पूर्वी एकदा ही सभा काँग्रेसच्याच वेळी अलाहाबाद येथे भरली होती. पण सामा- न्यतः काँग्रेसचा मुक्काम चुकवून दुसन्या ठिकाणी ती भरवावी असे मुसलमानाचे धोरण असे, मस्लिम लीगमध्ये असलेले बॅ० जीनासारखे काही चांगल्या अर्थाचे उभयान्वयी लोक मुसलमान संघाला काँग्रेसच्या जवळ जवळ आणू पाहात होते. आणि दोन्ही सभांचे राजकीय धोरण जवळ जवळ एक असल्यामुळे हा द्विधाभाव टाकून द्यावा असे त्यातील सुज्ञ पुढाऱ्याना वाटणे स्वाभाविक होते. याचवेळी