पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/४२८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

९८ लो० टिळकांचे चरित्र भाग ५ आयर्लंडमध्ये गेल्या दोन दिवसापासून धुमश्चक्री माजल्याचे वर्तमान तुम्हाला तारेने कळलेच असेल. पण या धुमश्चक्रीबद्दल खुद्द इंग्लंडच्या लोकास काय वाटते याचे सूक्ष्म प्रत्यंतर परवांच्या लंडन टाइम्सच्या अग्रलेखात पाहावयास सापडले. या अग्रलेखाचा सारांश रूटर तारेने हिंदुस्थानास सहसा पाठविणार नाही या समजुतीने तो खाली थोडक्यात देतो. पण त्यापूर्वी फक्त एकच गोष्ट सांगणे जरूर आहे ती ही की गेल्या महिन्यात टाइम्सने अमेरिकेला खूप करण्या- करिता आयर्लंडला वसाहतीच्या नमुन्याचे स्वराज्य द्यावे अशी जोराची चळवळ केली. तिचा उपयोग झाला नाही याचे टाइम्सला वैषम्य वाटले. पण त्याचा सदुपयोग इतकाच झाला की आयर्लंडातील असंतोषवर टाइम्सने हत्यार उपसून उठावयाचे ते न करिता त्याने त्या असंतोषाचे एक प्रकारे समर्थनच केले आहे. टाइम्स म्हणतो- " आयर्लंडातील दंगेधोपे मोडण्याचा प्रयत्न सरकाराने करावा हे ठीकच आहे. पण त्याने अधिकारी मुत्सद्यांच्या शहाणपणाची दिवाळखोरी झाकत नाही. एकाने दंगे करावे व दुसऱ्याने ते मोडावे या पाठशिवणीच्या भातुकलीच्या खेळापासून कोणासच काही फायदा नाही. दडपशाही हाही एक मार्ग आहे. पण तो एकतोंडी बोळाप्रमाणे आहे. या बोळात एका तोंडाने शिरता येते पण दुसऱ्या ast बाहेर मात्र निघता येत नाही. या स्थितीची जबाबदारी सर्वस्वी सरकारा- वर आहे. अत्याचार हे निराशेच्या परमावधीस जाऊन पोचलेल्या अल्प संख्यां- काचे शेवटचे हत्यार आहे. आयर्लंडातील जनसमाजाला अत्याचार व खून आवड- तात असे म्हणणे ही गोष्ट खोटी आहे. तसे म्हणणे अन्यायाचे होईल. इंग्रज लोकांचा द्वेष आयरिश लोकांच्या मनात जुनाच आहे. पण निराशेच्या रोज मिळ- णाऱ्या नव्या पुराव्यानेच तो दृढ होत आहे. स्वराज्याची आशा दिसती तर जे लोक नेमस्तपणाने वागले असते त्याना आज एकीकडे दडपशाही सरकार व दुसरीकडे अत्याचारी लोक या दोन दगडात सापडून भरडून निघाल्यासारखे वाटत आहे. या सर्वांना स्वराज्य देणे हाच उपाय ! " का ? कसे आहे ? असो. या दंग्याधोप्यांच्या गोष्टी बाजूस ठेवून या आठवड्यात दुसऱ्याच एका प्रकारची जी गोष्ट लंडनमध्ये घडली तिच्याबद्दल दोन शब्द अधिक लिहितो. ही गोष्ट म्हणजे सिटी टेंपल नामक धार्मिक सभागृहात शनवार ते बुधवार भर- लेली परिषद, या मंडळाला ही परिषद यंदा इंग्लंडातच भरविण्याची प्रेरणा का झाली माहीत नाही. पण तीनचार दिवस परिषदेचे काम पाहून केव्हा गंभीर सोज्वळ विचार मनात येत तर केव्हा या इंग्रज लोकांच्या ढोंगीपणाचे पोट धर- धरून हसू येई ! मंडळाचे हेतू जगातील युद्ध थांबविणे व शांततेच्या काळात सर्व देशातील मनुष्यवर्गामध्ये बंधुप्रेम वृद्धिंगत करणे असे आहेत. परिषद डॉ. क्लिफर्ड यांच्या अध्यक्षतेखाली भरली होती. ८४ वर्षांचे परम पवित्र गृहस्थ केवळ पाट- लोण घातलेले ऋषि आहेत येवढे म्हटले म्हणजे त्यात त्यांचे सर्व गुणवर्णन आले, त्यांचा जन्म धर्मपंथाचे द्वंद्व मोडण्यात आणि नाठाळांच्या पाठीत काठ्या